Ganeshotsav 2023 : चार फुटांवरील पीओपीच्या गणेशमूर्तींना परवानगी

90
Ganeshotsav 2023 : चार फुटांवरील पीओपीच्या गणेशमूर्तींना परवानगी

पोओपीच्या मूर्तींमुळे (Ganeshotsav 2023) मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. अशातच आता समोर आलेल्या माहितीनुसार चार फुटांवरील पीओपी गणेशमूर्ती यांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या गणेश मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाला काहीच दिवस असतांना अजूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अंतिम गाईडलाइन जाहीर न झाल्याने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आता चार फुटांवरील गणेशमूर्ती ‘पीओपी’ची वापरता येणार आहे. मात्र घरगुती आणि चार फुटांपेक्षा कमी असणाऱ्या मूर्ती मात्र मातीच्या असणे बंधनकारक आहे.

(हेही वाचा – Samriddhi Highway Accident : बसचालक मद्यधुंद अवस्थेत; फॉरेन्सिक अहवालातून सिद्ध)

मिळालेल्या माहितीनुसार,पीओपीला पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ४ फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र चार फुंटापेक्षा कमी उंच्या मूर्तांसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेते-साठवणूकदारांना आजपासून म्हणजेच शुक्रवार ७ जुलै पासून ‘एक खिडकी’ पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

‘एक खिडकी’ पद्धतीनं ऑनलाईन नोंदणी होणार

गणेशोत्सव तोंडावर आला असून महापालिकेच्या परवानग्या मिळवण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. मात्र यंदा महापालिकेची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. गणोशोत्सवाला अवघे तीन महिने शिल्लक आहेत. आता मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तीकारण आणि मूर्ती विक्रेत्यांसाठी आजपासून ‘एक खिडकी’ पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.