Gamified Learning App : महापालिका शाळांमधील मुलांना आता खेळातून शिक्षण

महापालिका शाळांमधील दहावीच्या मुलांच्या शिक्षणात अमुलाग्र बदल केला जात असून या मुलांना आता खेळातून शिक्षणाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी महापालिका शाळांमधील मुलांना गॅमीफिड लर्निंग ऍप उपलब्ध करून दिले जाणार आहे.

626
Gamified Learning App : महापालिका शाळांमधील मुलांना आता खेळातून शिक्षण

महापालिका शाळांमधील दहावीच्या मुलांच्या शिक्षणात अमुलाग्र बदल केला जात असून या मुलांना आता खेळातून शिक्षणाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी महापालिका शाळांमधील मुलांना गॅमीफिड लर्निंग ऍप (Gamified Learning App) उपलब्ध करून दिले जाणार आहे. महापालिका शाळांमधील दहावीच्या मुलांना देण्यात आलेल्या टॅबमध्ये या ऍपचा समावेश केला जाणार असून प्रत्येक टॅबमध्ये ऍप उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकी ८०५ रुपये खर्च केले आहेत. (Gamified Learning App)

दहावीच्या विद्यार्थ्यांना एकूण १९, ४०१ टॅब वितरीत

महापालिका शाळांमधील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे पडू नये म्हणून कौशल्य प्रशिक्षण, उपयोजित शिक्षण व तंत्रशिक्षण यांच्या समन्वयानेही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केला जातो. मुलांच्या पाठीवरील विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांपासून टॅब वितरीत करण्यात येत आहे. सन २०२२-२३ या वर्षांमध्ये महापालिकेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना एकूण १९, ४०१ टॅब वितरीत करण्यात आले. या टॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी ई कंटेंटसह इंटरनेट व इतर सुविधाही देण्यात आल्या आहेत. (Gamified Learning App)

(हेही वाचा – Naxalites Attack : छत्तीसगडमध्ये CRPF कॅम्पवर नक्षलवाद्यांचा हल्ला; 3 जवान हुतात्मा)

विद्यार्थ्यांचा अभ्यास हा आनंददायी

दिवसेंदिवस तंत्रज्ञान क्षेत्रात बदल होत असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास हा आनंददायी करण्यासाठी आता महापालिका प्रशासन खेळातून शिक्षण हा या गॅमीफिड लर्निंग्स (Gamified Learning App) हा नवीन प्रकार टॅबमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील मुलांना हे ऍप उपलब्ध करून दिले जात असून विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आलेल्या १९,४०१ टॅबमध्ये दिला जाणार आहे. (Gamified Learning App)

टॅबमधील प्रत्येकी ऍपकरता ८०५ रुपयांचा खर्च

दहावीच्या मुलांना वितरीत करण्यात आलेल्या या १९,४०१ टॅब मध्ये गॅमीफिल्ड लर्निंग्सह हे ऍप टाकण्यासाठी एड्युइजफन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक टॅबमधील प्रत्येकी ऍप करता ८०५ रुपये मोजले जाणार असून यासाठी एकूण १ कोटी ६५ लाख ९७ हजार ५५५ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. (Gamified Learning App)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.