Narendra Modi : शिवजयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात

Narendra Modi : शिवजयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात

175
Narendra Modi : शिवजयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात
Narendra Modi : शिवजयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात

लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर भाजपने रणनिती आखली आहे. अनेक विकासकामांची उद्घाटने केली जात आहेत. नुकतेच मुंबईतील ‘न्हावा-शेवा अटल सेतू’चा (Mumbai Trans Harbour Link) लोकार्पण सोहळा मोदींच्या हस्ते पार पडला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 19 फेब्रुवारी रोजी पुण्यात (Pune) येण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – CIDCO : नवी मुंबईतील सिडकोच्या इमारतींना नवी अभय योजना; मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती)

2 महिन्यांतील चौथा महाराष्ट्र दौरा

शिवजयंतीच्या दिनी पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri Fort) जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार आहेत. याच दिवशी पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचे उद्घाटनही होणार आहे. मागील दोन महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) महाराष्ट्रात मुंबई, नाशिक आणि सोलापूरनंतर आता पुण्यात येत आहेत.

लोकसभा निवडणुका फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून विकासकामांचे उद्घाटन आणि भूमीपूजने मोठ्या प्रमाणात चालू आहेत.

पंतप्रधान मोदींकडून (Narendra Modi) मोठ्या गृहप्रकल्पाचे उद्घाटन भारतातील सर्वांत मोठ्या गृहप्रकल्पाचे सोलापुरात (Solapur) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. १९ जानेवारीला सोलापुरातील रे नगर भागात या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्याचबरोबर इतर विकासकामांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.