बुलढाण्यात दोन ट्रकमध्ये भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी

110

बुलढाणा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर तांदुळवाडी पुलावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर तांदुळवाडी पुलावर विटांनी भरलेल्या ट्रकची दुसऱ्या एका ट्रकला धडक लागली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना मलकापूर येथे कुटीर रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघातात विटांनी भरलेल्या ट्रकचा पुढील भाग चिरडला गेला आहे. ट्रकला समोरून जोरात धडक बसल्याने समोरील काचा फुटल्या. तसेच ट्रक वाहन चालकाचा यात जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. कालांतराने मृतदेह बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

(हेही वाचा – बेस्ट बसला आग! गेल्या पंधरा दिवसातील दुसरी घटना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.