Veer Savarkar : वीर सावरकरांचे विचार जोपासून वाटचाल करा; सुनील पवार यांचे ओरोस जिल्हा कारागृहात मार्गदर्शन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून वीर सावरकर मुक्ती शताब्दी सोहळा साजरा करताना वीर सावरकर विचार त्यांनी भोगलेल्या हाल अपेष्टा या सर्वांसमोर आल्या पाहिजेत, असे सुनील पवार म्हणाले.

97

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात फार मोठे योगदान आहे. त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांचा आदर्श जोपासून वाटचाल करा, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे सदस्य आणि शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी मंगळवार, २३ जानेवारीला ओरोस जिल्हा कारागृह येथे केले. कारागृहातील बंदिवानसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रवास  चित्रफीतच्या माध्यमातून उलगडण्यात आला.

sunil 1

वीर सावरकरांचा प्रवास चित्रफितीच्या माध्यमातून उलगडला 

वीर सावरकर  (Veer Savarkar) यांनी देशासाठी आपले अखंड आयुष्य वेचले. अंदमान येथील तुरुंगात त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यावेळी हाल अपेष्टा सहन केल्या, अशा विद्याविभूषित असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर  (Veer Savarkar) यांचा प्रवास चित्रफीतीच्या माध्यमातून उलगडला जावा, या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने जिल्हा कारागृह ओरोस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारागृहाचे अधीक्षक ब्रह्मानंद लटपटे, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, कारागृहाचे अधिकारी भास्कर भोसले, आनंद उशिणकर, दॆ. सकाळ कुडाळ तालुका प्रतिनिधी अजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते विजय शिंत्रे, राजेंद्र पाटील, सत्यवान कदम, प्रार्थना परब, कावेरी राणे, अमित राणे आदी उपस्थित होते.
sunil 2

…म्हणून आपण आनंदी जीवन जगत आहोत

यावेळी बोलताना सुनील पवार म्हणाले, भारत देशाला स्वातंत्र्य मिळून मागील वर्षी अमृत महोत्सव वर्ष साजरे केले. ज्या वीरांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवून दिले ज्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिले, स्वतःच्या आयुष्याची रागरांगोळी केले, अशा अनेक हुतात्म्यांमध्ये एक व्यक्तिमत्त्व म्हणजे वीर सावरकर होय. त्यांच्यामुळेच आपण आनंदी जीवन जगत आहोत. भारत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात असणारे त्यांचे योगदान आपण विसरून चालणार नाही. त्यांचा आदर्श आपण सातत्याने घेतला पाहिजे. स्वातंत्रवीर सावरकर  (Veer Savarkar) यांचे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते. छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श प्रत्येकाने जोपासून वाटचाल केली पाहिजे. आज आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून वीर सावरकर मुक्ती शताब्दी सोहळा साजरा करताना वीर सावरकर विचार त्यांनी भोगलेल्या हाल अपेष्टा या सर्वांसमोर आल्या पाहिजेत, या अनुषंगाने आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. त्यांचा हा प्रवास चित्रफीतच्या माध्यमातून दाखवण्याचा आम्ही यानिमित्ताने प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.