Mahim Sea Food Plaza : मुंबईकरांनो, आता कशाला जायचे गोवा? माहिम समुद्र किनारी चाखा, चवदार भोजनाचा मेवा !

गरम कढईत जिरे-लसणाच्या फोडणीचा-वाटणाचा घमघमाट ... काही भट्ट्यांवर तापलेल्या तव्यावर खरपूस भाजत असलेले विविध प्रकारचे ताजे-ताजे चविष्ट मासे ... सजवलेल्या टेबलांवर खमंग आणि चवदार चटण्या, सोलकढी ... सोबतीला सुमधूर संगीत आणि समोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र ... अशा वातावरणात कुणाला नाही आवडणार तृप्तीचा ढेकर द्यायला..!

7720
Mahim Sea Food Plaza : मुंबईकरांनो, आता कशाला जायचे गोवा? माहिम समुद्र किनारी चाखा, चवदार भोजनाचा मेवा !

गरम कढईत जिरे-लसणाच्या फोडणीचा-वाटणाचा घमघमाट … काही भट्ट्यांवर तापलेल्या तव्यावर खरपूस भाजत असलेले विविध प्रकारचे ताजे-ताजे चविष्ट मासे … सजवलेल्या टेबलांवर खमंग आणि चवदार चटण्या, सोलकढी … सोबतीला सुमधूर संगीत आणि समोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र … अशा वातावरणात कुणाला नाही आवडणार तृप्तीचा ढेकर द्यायला..! आणि महत्त्वाचे म्हणजे हे समुद्रकिनारी असलेल्या कुठल्याही पंचतारांकित हॉटेलचे वर्णन नाही. तर हे आहे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या संकल्पनेतून आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने माहिम कोळीवाड्यात साकारलेल्या ‘सी फूड प्लाझा’चे वर्णन ! याच ठिकाणी समुद्राच्या लाटांचे संगीत आणि नृत्य अनुभवत, वरळी वांद्रे सागरी सेतूचे दृश्य बघत आपण ही खमंग मेजवानी अनुभवू शकतो, ते देखील अगदी घरगुती चवीच्या जेवणासह ! (Mahim Sea Food Plaza)

मुंबईतील कोळीवाड्याच्या ठिकाणी सुशोभीकरण करतानाच महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटन वृद्धीसाठी मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ माहिम येथे सुरू करण्यात आला आहे. महानगरपालिकेकडून विविध सेवा सुविधा या प्रकल्प अंतर्गत पुरविण्यात येत आहेत. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक सागरी खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी सदर ‘सी फूड प्लाझा’मुळे मिळते आहे. कोळीवाड्यातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी महिला बचतगटांद्वारे संचलित ‘सी फूड प्लाझा’ कल्पक संकल्पना राबविण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले होते. त्यानुसार मुंबईतील माहिममध्ये पहिल्या ‘सी फूड प्लाझा’च्या ठिकाणी दर्जेदार अन्नपदार्थ पुरवतानाच व्यवसायासाठी पूरक अशी साधनसामुग्री पुरविण्याचे निर्देशही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते. (Mahim Sea Food Plaza)

New Project 2024 02 17T183446.144

(हेही वाचा – BMC : मुंबईत २५ हजार भटक्या श्वानांपासून रेबीजची भीती नाही, कारण काय ते वाचा)

राहत्या ठिकाणीच रोजगार निर्मितीला चालना

याच अनुषंगाने महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागामार्फत तसेच नियोजन विभागाने प्रत्येक महिला बचतगटाला साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. ‘सी फूड प्लाझा’साठी आवश्यक दालन महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच टेबल, खुर्च्या, विद्युत रोषणाई, ओला आणि सुका कचरा संकलन डबे, ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी ऍप्रन, हातमोजे, हेडर कॅप आदी बाबी पुरविण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक महिला बचतगटाला दालनावर त्यांचे माहितीफलक लावण्याची विनंती करण्यात आली आहे. (Mahim Sea Food Plaza)

नोंदणीकृत कोळी महिला बचतगटांना ‘सी फूड प्लाझा’ दालन लावण्यासाठी आणि चालवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना सेवा पुरवताना स्वच्छतेबाबत आणि पदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, याची खातरजमा करण्याच्या सुचनाही यांनी देण्यात आल्या आहेत. स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध होईल, या दृष्टीने प्रयत्न करतानाच या परिसरात पर्यटनवाढीला चालना मिळावी, याच उद्देशातून कोळी महिला बचतगटांना नियोजन विभागाने साधनसामुग्री पुरवली आहे. तसेच आर्थिक पाठबळही उपलब्ध करून देण्यात आले. या सर्व गोष्टींचा फायदा महिला बचत गटांना दैनंदिन व्यवसायात होत असून राहत्या ठिकाणीच रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे. (Mahim Sea Food Plaza)

New Project 2024 02 17T183550.391

(हेही वाचा – Atal Setu: मॅरेथॉनमुळे अटल सेतू १० तासांसाठी बंद, अत्यावश्यक वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध; वाचा सविस्तर)

१४ बचत गटांसाठी सी फूड प्लाझा

सुरूवातीच्या काळात कोळी महिलांना बचत गटाचे महत्त्व पटवून देण्यापासून ते रोजगारासाठी ‘सी फूड प्लाझा’ची संकल्पना सांगण्यासाठी सातत्याने समुपदेशन करण्यात आले. त्यासोबतच महिला बचत गटांना मत्स्य उत्पादनावर आधारित प्रशिक्षणही देण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण आणि विक्रीयोग्य मत्स्य आधारित उत्पादने तयार करण्यासाठी मत्स्यपालन क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य उपलब्ध करून देणे हा प्रशिक्षणामागचा उद्देश होता. परिणामी कौशल्य विकसित होतानाच महिलांचे जीवनमान उंचावेल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्था वाढीस लागण्यासोबतच विकासही होईल, याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. माहिम कोळीवाड्यात एकूण १४ बचत गटांसाठी सी फूड प्लाझा तयार केला आहे. ग्राहकांना आकर्ष‍ित करण्यासाठी अत‍िशय सूत्रबद्ध पद्धतीने बांधकाम करून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बचत गटाने आकर्षक आणि टिकाऊ तंबूसदृश्य ‘गजेबो’ उभारून त्यावर विद्युत रोषणाई केली आहे. (Mahim Sea Food Plaza)

पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर २०२३ पासून ‘सी फूड प्लाझा’साठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी महानगरपाल‍िकेच्या न‍ियोजन व‍िभागाने पुढाकार घेत बचत गटांना याद्वारे रोजगार द‍िला. सुरुवातीला आलेल्या अडचणींवर मात करीत महानगरपालिकेचा ‘जी उत्तर’ विभाग आण‍ि नियोजन विभाग यांनी सूक्ष्मस्तरीय नियोजन केले. त्याचबरोबर बचत गटांच्या मह‍िलांना महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागाच्या सहकार्याने विविध स्तरीय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये मत्स्याहारी पदार्थ तयार करणे, विपणन (मार्केटिंग) करणे, संस्था व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी या निमित्ताने दिली आहे. (Mahim Sea Food Plaza)

New Project 2024 02 17T183646.711

(हेही वाचा – Manoj Jarange : मराठा समाजाने मुंबई-आग्रा महामार्ग अडवल्यानंतर जरांगे यांनी दिला कार्यकर्त्यांना महत्वाचा सल्ला; म्हणाले …)

चार मह‍िन्यात ४० हजार खवय्यांनी चाखली चव

एकूण १४ बचत गटांसाठी सी फूड प्लाझा उभारला असून, येथे नोव्हेंबर २०२३ पासून तब्बल ४० हजार खवय्यांनी भेट द‍ेत येथील पाककृतींचा आस्वाद घेतला आहे‌. आठवडयातील ४ दिवस म्हणजे बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हा प्लाझा सुरू असतो. याश‍िवाय खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मशीदेखील बचत गटांनी टाय-अप (उदाहरणार्थ झोमॅटो, स्विगी आदी) केले आहे. (Mahim Sea Food Plaza)

खाद्य संस्कृतीला येणार बहर

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी अशाप्रकारचे ‘सी फूड प्लाझा’ आणखी काही ठ‍िकाणी सुरू करण्यात येणार आहे. माहिम येथील पथदर्शी प्रकल्पास (पायलट प्रोजेक्ट) म‍िळालेला प्रत‍िसाद पाहता पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या प्रेरणेने आण‍ि महानगरपाल‍िकेच्या पुढाकाराने मुंबईतील इतर कोळीवाड्यांमध्ये देखील हा प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त आंबी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. (Mahim Sea Food Plaza)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.