Manoj Jarange : मराठा समाजाने मुंबई-आग्रा महामार्ग अडवल्यानंतर जरांगे यांनी दिला कार्यकर्त्यांना महत्वाचा सल्ला; म्हणाले …

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धूमधडाक्यात साजरी करा. मराठा आंदोलन शांतपणे पण ताकदीने करा. आता आमचं शेतीचं काम उरकलेलं आहे. आंदोलन करताना काळजी घ्या.

292
Manoj Jarange : सगेसोयऱ्यांना आरक्षण न दिल्यास पश्चातापाची प्रचिती येईल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारंगे (Manoj Jarange) यांनी १० फेब्रुवारी रोजी आपले आंदोलन पुन्हा सुरू केले होते. दरम्यान, जरांगे यांनी अन्न – पाणी बंद केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. अशातच बुधवार १४ फेब्रुवारी रोजी नाकातून रक्तस्त्राव सुरु होऊन हात – पाय थरथरायला लागले होते. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी आधी आरसा बघावा)

मराठा समाजाने अडवला मुंबई-आग्रा महामार्ग –

याच पार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने आज मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. सकल मराठा बांधवांच्या वतीने नाशिकमध्ये मुंबई-आग्रा रोड वर रस्ता अडवण्यात आला. या आंदोलनात शेकडो मराठा सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको केल्याचं त्यांनी सांगितलं. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी १० वी, १२ वीची परीक्षा असल्याने शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच २०, २१ तारखेनंतर मुंबईला कधी जायचं आहे ते सांगू असंही म्हटलं आहे.

(हेही वाचा – Eknath Shinde: मनोहर जोशींचे घर जाळायला माणसे पाठवली, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप)

काय म्हणाले जरांगे पाटील ?

मराठा समाजाला विनंती आहे की सध्या १० वी, १२ वीची परीक्षा आहे. त्यामुळे शांततेत आंदोलन करा. विद्यार्थ्यांची गैरसोय करू नका. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाता यायला हवं. विद्यार्थी हे देश आणि राज्याचे भवितव्य आहेत. त्यांना अडचण यायला नको याची काळजी घ्या. २० आणि २१ तारखेनंतर मुंबईला कधी जायचं ते सांगू,” असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत.

शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करा –

“छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धूमधडाक्यात साजरी करा. मराठा आंदोलन शांतपणे पण ताकदीने करा. आता आमचं शेतीचं काम उरकलेलं आहे. आंदोलन करताना काळजी घ्या. आपल्यात कुणी शिरतं का? विद्यार्थ्यांना परीक्षेत अडचण येणार नाही याची खबरदरी घ्या. (Manoj Jarange)

(हेही वाचा – Atal Setu: मॅरेथॉनमुळे अटल सेतू १० तासांसाठी बंद, अत्यावश्यक वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध; वाचा सविस्तर)

लोकशाही मार्गाने आंदोलन करा –

लोकशाही मार्गाने आंदोलन करा. २० – २१ तारखेपर्यंत सरकार सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करतं का ते बघू त्यानंतर ठासून आंदोलन करू, असा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.