कोरोनाचा नवा विषाणू एक्सई मुंबईत पोहोचला

131

युकेमध्ये आढळलेल्या एक्सई या कोरोनाच्या नव्या विषाणूने मुंबईत अखेर प्रवेश केला आहे. याबाबतची खात्रीलायक माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यविभागानेच जाहीर केली आहे. ५० वर्षीय महिलेला एक्सई या कोरोनाच्या नव्या विषाणूची बाधा झाली होती. या महिलेला गेल्याच महिन्यात झालेल्या तपासणीतून एक्सई या विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र महिन्याभरानंतर पालिका आरोग्य विभागाने मुंबईत एक्सई विषाणू पोहोचल्याची माहिती समोर आणली.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ उपक्रम; कोणतेही बिल भरा आपल्याच दारी! )

हा विषाणू युकेतून जरी जगभरात पहिल्यांदा सापडला असला तरीही मुंबईत बाधा झालेली ही एक्सई विषाणूबाधित महिला १० फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत परतली होती. ही महिला दक्षिण आफ्रिकेची रहिवासी असून, व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. महिलेने मुंबईत येण्याअगोदर कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नव्हता. प्रवासानंतर तिची कोरोना चाचणी करण्यात आली परंतु चाचणी अहवालात तिला कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले. २ एप्रिल रोजी या महिलेने खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी केली असता तिची चाचणी पॉझिटीव्ह आली. तिला ताज लॅण्ड हॉटेलमध्ये विलगीकरणासाठी ठेवले गेले. दुस-या दिवशी तिची चाचणी नकारात्मक आली. या महिलेने कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही लस घेतल्या होत्या. शिवाय या महिलेला कोणतेही गंभीर स्वरुपाचे आजार नसल्याची माहितीही पालिका आरोग्यविभागाने दिली.

एक्स ई विषाणूबाबत –

एक्स ई हा विषाणू यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला युकेत सापडला होता. हा विषाणू ओमायक्रोनपेक्षाही वेगाने पसरतो, अशी चर्चा आहे. युकेत आतापर्यंत ६३७ एक्सई बाधित रुग्ण मार्चच्या अखेरीपर्यंत सापडले. या विषाणूबाबत अद्यापही तपशीलवार माहिती जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.