Home समाजकारण BMC : ‘त्या’ परिपत्रकाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी आयुक्तांनी पुन्हा पाठवल्या अतिरिक्त आयुक्तांसह इतरांकडे...

BMC : ‘त्या’ परिपत्रकाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी आयुक्तांनी पुन्हा पाठवल्या अतिरिक्त आयुक्तांसह इतरांकडे फाईल्स

ज्या परिपत्रकांमध्ये यापूर्वी म्हणजे ऑगस्ट २०२० व सन २०२२ मध्ये जारी केलेल्या दोन परिपत्रकांतील सूचनेचे पालन होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

170
BMC : ‘त्या’ परिपत्रकाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी आयुक्तांनी पुन्हा पाठवल्या अतिरिक्त आयुक्तांसह इतरांकडे फाईल्स
BMC : ‘त्या’ परिपत्रकाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी आयुक्तांनी पुन्हा पाठवल्या अतिरिक्त आयुक्तांसह इतरांकडे फाईल्स

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यापूर्वीच्या दोन परिपत्रकांचे स्मरण करून देत सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि खातेप्रमुख यांना प्रत्येक नस्ती अर्थात फाईलवर स्वाक्षरी करताना संबंधित विषयासंदर्भात आपले सकारात्मक तथा नकारात्मक स्पष्ट अभिप्राय स्वरुपात नोंदवण्याचे निर्देश दिल्यानंतर यापूर्वी स्पष्ट अभिप्राय नसलेल्या सर्व फाईल्स आता आयुक्तांनी संबंधितांकडे परत पाठवल्या आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात एक परिपत्रक जारी केले आहे.

ज्या परिपत्रकांमध्ये यापूर्वी म्हणजे ऑगस्ट २०२० व सन २०२२ मध्ये जारी केलेल्या दोन परिपत्रकांतील सूचनेचे पालन होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आयुक्तांनी पुन्हा एकदा या परिपत्रकाचे स्मरण करून देत यापूर्वी केलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामध्ये प्राधान्याने अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त आणि खातेप्रमुखांना प्राधान्याने सूचना करत प्रत्येक फाईल्स तसेच पेपरवर स्वाक्षरी करताना त्याबाबतच्या आपल्या सूचनांचेही टिपणही नोंद केले जावे असे म्हटले आहे. यापूर्वी दोन वेळा फाईल्सवर स्पष्ट शब्दात सकारात्मक किंवा नकारात्मक अभिप्राय नोंदवण्याचच्या सूचना करूनही कोणत्याही प्रकारे आपले स्पष्ट मत न मांडता किंवा सूचना न मांडता यापूर्वी केवळ कोंबडा काढून आयुक्तांच्या मंजुरीला पाठवला जात होता.

(हेही वाचा – Municipal Schools : महापालिका शाळांमधील मुलांना ज्ञानासह टेक्नोसॅव्ही करा)

संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणत्याही सूचना किंवा अभिप्राय नोंदवले जात नसल्याने आयुक्त हे अंतिम मंजुरी देताना त्याच आधारे देत असतात. त्यामुळे जर अशाप्रकारे अतिरिक्त आयुक्त, खातेप्रमुख व उपायुक्त यांचे अभिप्राय नोंदवले गेले तर आयुक्तांना त्यावर स्वाक्षरी करताना खालच्या अधिकाऱ्यांचे मत जाणून घेऊन पुढील मंजुरी देणे इष्ट ठरेल. त्यामुळेच आयुक्तांनी पुन्हा एकदा परिपत्रक काढून केवळ संशिप्त नावाने स्वाक्षरी करणे किंवा खालच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली म्हणून त्याआधारे मंजुरी दिली जाते.

आयुक्तांच्या परिपत्रकानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीने तसेच खातेप्रमुखांच्या स्वाक्षरीने ज्या फाईल्स आयुक्तांकडे पाठवल्या होत्या त्या सर्व फाईल्स आयुक्तांनी पुन्हा अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त तसेच उपायुक्त व खातेप्रमुख यांचे स्पष्ट अभिप्राय नसलेल्या फाईल्सवर आयुक्तांनी आपली स्वाक्षरी करण्यास स्पष्ट नकार दिला असून त्यामुळेच खालच्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह स्पष्ट अभिप्राय प्राप्त झाल्यानंतरच आयुक्त संबंधित फाईल्सवर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
error: Content is protected !!