Donated Organs: शेतकऱ्याने अवयवदान करून चौघांना दिले जीवनदान

नागपूर येथील अवयवदानाची संख्या 19 पर्यंत पोहोचली

116
Donated Organs: शेतकऱ्याने अवयवदान करून चौघांना दिले जीवनदान
Donated Organs: शेतकऱ्याने अवयवदान करून चौघांना दिले जीवनदान

मध्य प्रदेशातील सिवनी प्रदेशात राहणाऱ्या शेतकऱ्याने अवयवदान करून राज्यातील चार रुग्णांना नवे जीवनदान दिल्याची घटना नागपूर येथे घडली. या अवयवदानामुळे नागपूर येथील अवयवदानाची संख्या 19 पर्यंत पोहोचली.

गणेश सवाई (44) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातून परत येत असताना गणेश सवाई यांचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून खाली पडताना सवाई यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना सुरुवातीला नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. प्रकृतीत फारशी सुधारणा दिसून न आल्याने नातेवाईकांनी त्यांना नागपूर येथील भारतीय आयुर्विद्यान संस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले. रुग्णालयातील अवयवदाता समन्वयक प्रीतम त्रिवेदी आणि प्राची खैरे यांनी कुटुंबियांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. समुपदेशनानंतर कुटुंबियांनी दोन मूत्रपिंडे, यकृत आणि दोन डोळ्यांच्या दानासाठी परवानगी दिली. ही माहिती नागपूर येथील अवयव दान प्रत्यारोपण समन्वय समितीला दिली गेली. समितीचे अवयवदान समन्वयक दिनेश मंडपे यांनी रुग्णांच्या प्रतीक्षा यादी तपासून अवयवदानाचे वाटप केले. 2013 सालापासून हे नागपूर येथील 113वे अवयवदान आहे.

 (हेही वाचा- Talathi Exam : तलाठी परीक्षेमधील भोंगळ कारभार; सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा सुरु होण्यास विलंब)

अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय?
मृत व्यक्तीच्या किंवा जिवंत व्यक्तीच्या फुफ्फुसाचा किंवा मूत्रपिंडाचा काही भाग शस्रक्रियेद्वार विलग करुन गरजू रुग्णाच्या शरीरात देणे म्हणजे अवयव प्रत्यारोपण होय. ही प्रमाणित वैद्यकीय उपचार पद्धती आहे.

कोणत्या अवयवांचे दान करता येते
० मृत रुग्णाचे हृदय बंद पडले असेल तर केवळ डोळे आणि त्वचेचे दान करता येते. हृदय बंद पडल्याने इतर अवयवांना रक्त पुरवठा बंद झालेला असतो. इतर सर्व अवयव प्रत्यारोपणासाठी बाद ठरलेले असतात.
० उपचारादरम्यान किंवा अपघातानंतर रुग्ण कित्येकदा मेंदू मृत अवस्थेत जातो. या अवस्थेत रुग्णाची जगण्याची शक्यता नसते. परंतु हृदयप्रक्रिया सुरु असते. मेंदू मृत रुग्णाकडून अनेक अवयवांचे दान करता येते. मूत्रपिंडे, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंडे, हृदय, आतडी, नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानाचे ड्रम यांचे दान करता येते
अवयवदान कायदेशीर प्रक्रिया
० देशात मानवी अवयव प्रतिरोपण कायदा १९९४ नुसार मेंदू मृत डॉक्टरांनी विशिष्ट चाचण्यानंतर घोषित करणे आणि अवयवदान या दोघांनाही कायदेशीर मान्यता आहे.
० मेंदू मृत मृत्यू हा प्रत्यारोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या तपासाअंती घोषित केला जातो.
० माननी अवयवांच्या व्यापाराला या कायद्यात कायदेशीर मान्यता नाही. तसेच या कार्यात कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नाही.
० दात्याच्या कुटुंबीयांना अवयव मिळालेल्या रुग्णाचे नाव व पत्ता दिला जात नाही. कायद्यानुसार यासाठी परवानगी दिली जात नाही. रुग्णालादेखील दात्याची तसेच त्याच्या कुटुंबीयांची माहिती दिली जात नाही.
अवयवदानाची प्रक्रिया
० जिवंतपणीच रुग्णाने अवयवदानाचा निर्णय घेतला असेल तर रुग्णाने कुटुबीयांना याबाबतची कल्पना देणे आवश्यक ठरते. कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय रुग्णाकडून मृत्यूपश्चात अवयवदान करता येत नाही.
० अवयवादासाठी प्रत्येक राज्यातील रुग्णालये तसेच रुग्णालयाशी निगडीत अवयव प्रत्यारोपण समिती कार्यरत असतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.