Elon Musk : ट्विटरवरून आता ‘हे’सुद्धा करता येणार; एलॉन मस्क यांनी केली नव्या फीचरची घोषणा

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी २०२० च्या ऑक्टोबर महिन्यात ट्विटरला विकत घेतले होते. तेव्हापासून मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले.

151
Elon Musk : ट्विटरवरून आता 'हे'सुद्धा करता येणार; एलॉन मस्क यांनी केली नव्या फीचरची घोषणा

ट्विटर (Elon Musk) ही कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी २०२० च्या ऑक्टोबर महिन्यात ट्विटरला विकत घेतले होते. तेव्हापासून मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले. अगदी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सीईओ पदाची जबाबदारी मस्क यांच्या खांद्यावर होती. त्यानंतर त्यांनी लिंडा यांची सीईओ पदावर नियुक्ती केली. त्यांच्या एका नवीन ट्विटमुळे एलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

(हेही वाचा – Conversion : ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातूनही धर्मांतरण)

आणखी एक फिचर

मंगळवार ३० मे २०२३ रोजी मस्क यांनी एक ट्विट (Elon Musk) पोस्ट केले. त्या ट्विटमधून मस्क (Elon Musk) यांनी एका नवीन फीचरची घोषणा केली. त्यानुसार आता ‘ट्विटरवर व्हिडीओचा प्ले बॅक स्पीड’ बदलता येणार आहे. मस्क यांचे हे ट्विट आतापर्यंत १३ दशलक्ष युजर्सने पाहिलं असून ९० हजार लोकांनी ते लाईक केलं आहे. तर अनेकांनी यावर मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत.

 

काही दिवसांपूर्वी मस्क (Elon Musk) यांनी ३५० दशलक्ष युजर्सची माफी मागितली होती. इतर अॅप्सच्या तुलनेत ट्विटर अॅप जास्त जागा घेते. त्यामुळे मी तुमची माफी मागतो, असे मस्क म्हणाले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.