NCERT 12th Book : बारावीच्या पुस्तकातून खलिस्तानचा उल्लेख काढण्याचा निर्णय

12वीच्या पुस्तकातून खलिस्तानचा उल्लेख काढून टाकावा, असे एसजीपीसीने म्हटले होते. तसेच, ती गोष्ट देखील NCERT च्या पुस्तकांमधून काढून टाकण्यात यावी, ज्यामध्ये शिखांचे फुटीरतावादी म्हणून वर्णन केले आहे.

156
NCERT: हिंदुत्व, गुजरात दंगल आणि अल्पसंख्याक...'हे' संदर्भ एनसीईआरटी पुस्तकातून काढले; कारण जाणून घ्या...

एनसीईआरटी 12वीच्या (NCERT) पुस्तकातून खलिस्तानचा उल्लेख काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण सचिव संजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने इयत्ता 12वीसाठी इतिहास, नागरिकशास्त्र आणि हिंदी या विषयांच्या अभ्यासक्रमात काही बदल केले आहेत. इतिहासाच्या पुस्तकातून मुघल साम्राज्याशी संबंधित प्रकरण काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय हिंदी पुस्तकातून काही कविता आणि परिच्छेद काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा – Temple Dress Code : अमरावतीतील अंबामाता, महाकाली संस्थासह ८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघ)

मागील महिन्यात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) पुस्तकातून वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी एनसीईआरटीला (NCERT) तसे पत्र लिहिले होते.

12वीच्या पुस्तकातून खलिस्तानचा उल्लेख काढून टाकावा, असे एसजीपीसीने म्हटले होते. तसेच, ती गोष्ट देखील NCERT च्या पुस्तकांमधून काढून टाकण्यात यावी, ज्यामध्ये शिखांचे फुटीरतावादी म्हणून वर्णन केले आहे. एसजीपीसीचे मुख्य अधिवक्ता हरजिंदर सिंग धामी यांनी म्हटले होते की, श्री आनंदपूर साहिब ठरावाबाबत चुकीची माहिती नोंदवण्यात आली आहे.

एसजीपीसीने एनसीईआरटीला (NCERT) लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, पुस्तकांतून शिखांविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास केला जात आहे. इयत्ता 12वीच्या पुस्तकातील 7 व्या प्रकरणात आनंदपूर साहिब आणि खलिस्तानची माहिती दिली आहे.

हेही पहा – 

त्यात म्हटले आहे की 1973 मध्ये आनंदपूर साहिब ठराव शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) स्वीकारला होता. पुस्तकात हा प्रस्ताव (NCERT) ‘फुटीरवादी प्रस्ताव’ म्हणून दाखवण्यात आला आहे. ठरावाच्या माध्यमातून प्रादेशिक स्वायत्ततेची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा धडा वाचताना शीख पक्षाकडून वेगळ्या राष्ट्राची मागणी होत असल्याचे दिसते. मात्र, तसे नाही. त्यामुळे ते काढून टाकले पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.