Elon Musk : एलॉन मस्क ट्विटरच्या सीईओ पदावरून पायउतार होणार; सीईओ पदाची सूत्रे ‘या’ व्यक्तीच्या हाती येणार

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर ४४ अब्जांना विकत घेतले. तेव्हपासून सर्वांनी कंपनीने अनेक चढ-उतार पाहीले.

46
Elon Musk : एलॉन मस्क ट्विटरच्या सीईओ पदावरून पायउतार होणार; सीईओ पदाची सूत्रे 'या' व्यक्तीच्या हाती येणार

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर ४४ अब्जांना विकत घेतले. तेव्हपासून सर्वांनी कंपनीने अनेक चढ-उतार पाहीले. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांची कपात, ब्लू टिक काढणे, मध्येच ट्विटरचा लोगो बदलणे इत्यादी. अशातच आता एलॉन मस्क यांनी एक ऐतिसाहीक निर्णय घोषीत केला आहे. त्यानुसार एलॉन मस्क आता ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांना गोंधळात टाकले आहे.

(हेही वाचा – Elon Musk : निव्वळ योगायोग की मस्क यांचा डाव? ट्विटरच्या कर्मचाऱ्याकडून व्हाट्सअँपच्या प्रायव्हसीवर प्रश्न उपस्थित)

पण राजीनामा का?

खुद्द मस्क (Elon Musk) यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून १२ मे रोजी रात्री घोषीत केले की ते राजीनामा देणार आहेत. नवीन मुख्य अधिकारी सहा आठवड्यांत पदभार स्वीकारणार आहे. मस्क यांच्या जागेवर येणारी व्यक्ती कोण असणार आहे याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहीती समोर आली नाही. मात्र मस्क यांनी सांगितले की ट्विटरचे सीईओपद एक स्त्री स्वीकारणार आहे. आता ती व्यक्ती कोण असेल या विषयी काही तर्क लावण्यात येत आहेत.

हेही पहा – 

कोण होणार नवा सीईओ?

अमेरीकेतल्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ‘लिंडा याकारिनो’ यांच्याकडे नव्या सीईओ पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. लिंडा यांनी गेल्या एका दशकापेक्षा जास्त एनबीसी युनीवर्सलसाठी काम केले आहे. (Elon Musk)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.