Electricity Demand : मुंबईत एका दिवसात ३९६८ मेगावॅट विजेच्या मागणीची नोंद

मुंबई शहर आणि जिल्ह्यात बेस्टसोबतच टाटा (Electricity Demand) आणि अदानी या खाजगी कंपन्यांकडून पूर्व व पश्चिम उपनगरांत विजेचा पुरवठा केला जातो.

116
Electricity Demand : मुंबईत एका दिवसात ३९६८ मेगावॅट विजेच्या मागणीची नोंद

एकीकडे राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला असून मुंबईत मात्र उकाड्याने (Electricity Demand) नागरिक हैराण झाले आहेत. कमाल तापमान सरासरी ३७-३८ अंशांवर असले, तरी आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने उकाडा दिवसेंदिवस असह्य होत आहे. परिणामी घरोघरी, कार्यालयांत दिवसभर पंखे, एसी आणि कुलर्स सुरू असल्याने विजेच्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईत तब्बल ३,९६८ मेगावॅट (Electricity Demand) एवढी विजेची सर्वाधिक मागणी नोंदवण्यात आली. यंदाच्या उन्हाळ्यातील हा उच्चांक असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईसोबतच ठाणे, रायगड, पालघर हे जिल्हे आणि नवी मुंबईतही विजेची (Electricity Demand) मागणी प्रचंड वाढली. मुंबईतील सर्व औद्योगिक आस्थापना, कार्यालये, घरांतील विजेचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम बुधवारी दिसून आला. या आधी १९ एप्रिल रोजी ३,५०० मेगावॅट विजेची मागणी नोंदवण्यात आली होती.

(हेही वाचा – Shiv Rajyabhishek Sohala 2023 : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज)

मुंबई शहर आणि जिल्ह्यात बेस्टसोबतच टाटा (Electricity Demand) आणि अदानी या खाजगी कंपन्यांकडून पूर्व व पश्चिम उपनगरांत विजेचा पुरवठा केला जातो. तसेच महावितरणकडून भांडूप व मुलुंड येथे विजेचा पुरवठा केला जातो. मुंबईच्या विजेची मागणी सर्वसाधारणपणे ३,५०० मेगावॅट एवढी नोंदविण्यात येते. त्यानुसार विजेचा पुरवठाही केला जातो. मात्र उन्हाळ्यात विजेची मागणी तब्बल चार हजार मेगावॉटपर्यंत नोंदविण्यात येते. वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी अदानीकडून डहाणू येथील पॉवर प्लांटमधून वीज घेतानाच करारानुसार इतर ठिकाणांहून वीज घेतली जाते. टाटाकडून ट्रॉम्बे प्लांटमधून विजेचा पुरवठा केला जात असून, टाटा पॉवरकडून बेस्टलाही विजेचा पुरवठा केला जातो.

दरम्यान मागणी आणि पुरवठा यात तफावत आल्यावर प्रशासनाला भारनियमन करणे अपरिहार्य असते. त्याचप्रमाणे अंधेरी, गोरेगाव, विलेपार्ले, मालाड, घाटकोपर, पवई परिसरात बुधवारी सायंकाळी वीजपुरवठा (Electricity Demand) खंडित झाला. ऐन उकाड्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अक्षरश: काहिली झाली होती. मुंबईच्या पश्चिम उपनगरांत अदानी इलेक्ट्रिसिटीकडून विजेचा पुरवठा केला जातो. गोरेगाव येथील संतोषनगर, आदर्शनगरसह लगतच्या परिसरात पावणेसहाच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. किमान अर्धा तास या परिसरात वीज नव्हती, असे येथील रहिवासी सुनील कुमरे यांनी सांगितले. विलेपार्ले, अंधेरी येथील रहिवाशांशी संपर्क साधला असता त्यांनीही सायंकाळी अंधेरी परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगितले. पश्चिम उपनगरात सर्वत्र ही अडचण आल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

हेही पहा – 

दुसरीकडे आरे कॉलनीतील अदानीच्या वीज (Electricity Demand) उपकेंद्रात २२० केव्हीच्या वीजवाहिनीत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे (ट्रिपिंग) मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वीजपुरवठा अर्धा ते पाऊण तास खंडित झाला होता. मात्र ४० मिनिटांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, असे अदानी कंपनीकडून सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.