Tripura News : इंडिगोच्या विमानात अमली पदार्थांच्या नशेत प्रवाशाची सहप्रवाशांना मारहाण

104
Tripura News : इंडिगोच्या विमानात अमली पदार्थांच्या नशेत प्रवाशाची सहप्रवाशांना मारहाण
Tripura News : इंडिगोच्या विमानात अमली पदार्थांच्या नशेत प्रवाशाची सहप्रवाशांना मारहाण

इंडिगोच्या विमानात बिस्वजीत देबनाथ नावाच्या व्यक्तीने प्रवाशांना मारहाण केली. (Tripura News) या प्रवाशाने अमली पदार्थांच्या नशेत विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर विमानात भितीचे वातावरण निर्माण झाले. तो इंडिगोच्या हैदराबाद ते गुवाहाटी या विमानाने तो अगरतलाचा प्रवास करत होता. विमान जेव्हा लँड होणार होते, त्यावेळी तो अचानक दरवाजाच्या दिशेने धावत गेला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान क्रू मेंबरने त्याला थांबवले आणि मोठा अनर्थ ठरला. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच आरोपीने अमली पदार्थाचे सेवन केले होते. आरोपीच्या मारहाणीत क्रू लीडर चंद्रिम चक्रवर्ती आणि मनीष जिंदाल हे देखील गंभीर जखमी झाले.

(हेही वाचा – Mahadev App Case : महादेव अ‍ॅप प्रकरण- मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटी बनणार साक्षीदार )

बिस्वजीत देबनाथ फ्लाईटचा दरवाजा उघडण्यासाठी त्या दिशेने गेले, त्यावेळी विमानातील एअरहॉस्टेसने लगेच प्रवाशाला पकडले आणि इतर प्रवाशांच्या मदतीने त्याला मागे ओढले. (Tripura News) या वेळीही आरोपी क्रू मेंबर गैरवर्तन केले आणि वारंवार दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. आरोपीची गैरवर्तणूक पाहून संतापलेल्या प्रवाशांनी आरोपीला मारहाण केली. या मारहाणीत तो जखमी झाला आहे. अगरतळा येथे विमानतळावर पोहचल्यानंतर इंडिगो स्टाफ बरोबर सीआयएसएफ जवानांनी आरोपीला एअरपोर्ट पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथे आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या आरोपीची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीला (एअर इंडिया) गेल्या काही दिवसांत दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांशी असभ्य वर्तन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. विमान प्रवासात गैरवर्तन केल्याचे हे सातवे प्रकरण आहे. 11 मार्चला रत्नाकर द्विवेदी या अमेरिकी नागरिकाने लंडन- मुंबई प्रवासादरम्यान सिगरेट ओढण्यास मनाई केल्यानंतर जबरदस्तीने एमर्जन्सी एग्झिटचा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. (Tripura News)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.