Dr. Mohan Bhagwat : समाजाच्या एकतेसाठी राजकारणापासून दूर जात विचार करण्याची गरज

संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव साजरा

20
Dr. Mohan Bhagwat : समाजाच्या एकतेसाठी राजकारणापासून दूर जात विचार करण्याची गरज

आपल्या देशातील आंतरिक असंतुष्टांना हाताशी धरून काही परदेशी शक्ती इथले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतात हिंसा आणि असंतोष पसरावा याकरिता “टूल किट” सक्रिय केले जातात. तेव्हा असे फसवे मायाजाल आणि भ्रामक गोष्टींपासून सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील रेशिमबाग मैदानावर आयोजित (Dr. Mohan Bhagwat) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे आणि महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी सरंसंघचालक (Dr. Mohan Bhagwat) म्हणाले की, आपल्या समाजाचे विघटन होऊन विलगता आणि आपापसातील संघर्ष वाढत जावेत यासाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. हे लोक स्वतःला सांस्कृतिक मार्क्सवादी म्हणवत असले तरी 1920 च्या दशकातच ते मार्क्सला विसरले असून केवळ सत्ता प्राप्ती इतकेच त्यांचे उद्दिष्ट आहे. ते जगातील सर्व सुव्यवस्था, मांगल्य, संस्कार आणि संयम यांना विरोध करतात. देशात आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी युती करण्याचा अविवेक केला जात आहे. समाजाच्या एकतेसाठी राजकारणापासून दूर जात विचार करण्याची गरज असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) म्हणाले.

(हेही वाचा – Israel Hamas War : हमासच्या दहशतवाद्यांकडून क्रूरतेचा कळस; गर्भवती महिलेचे पोट कापले आणि…)

मणिपूरमधील हिंसेबाबत चिंता व्यक्त करताना डॉ. भागवत म्हणाले की, “गेल्या १० वर्षांपासून शांत असलेल्या मणिपूरमध्ये अचानक कलह का आणि कसा निर्माण झाला? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का? आपल्या अस्तित्वाच्या भवितव्याबाबत धास्तावलेल्या मैतेई आणि कुकी समाजाच्या संघर्षाला जातीय वा धार्मिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न का आणि कोणाकडून करण्यात आला? यात बाह्य शक्तींचा हात होता का? असा सवाल सरसंघचालकांनी उपस्थित केला. तसेच ही समस्या सोडवण्यासाठी बहुआयामी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, अनुरूप सक्रियता आणि कार्यक्षमता ही काळाची गरज असतानाच, समाजातील प्रबोधनशील नेतृत्वालाही परस्परांमधील अविश्वासाची दरी भरून काढण्यासाठी विशेष भूमिका बजावावी लागेल असे सरसंघचालकांनी (Dr. Mohan Bhagwat) सांगितले.

मंदिरासोबत मनातही रामाची प्राणप्रतिष्ठा व्हावी

अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात आगामी २२ जानेवारी रोजी श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. व्यवस्थेच्या मर्यादा आणि सुरक्षेची सावधानता लक्षात घेऊन अयोध्येत त्या शुभ प्रसंगी केवळ मर्यादित संख्येतंच उपस्थित राहता येणार आहे. अयोध्येतील राममंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी (Dr. Mohan Bhagwat) केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.