Israel Hamas War : हमासच्या दहशतवाद्यांकडून क्रूरतेचा कळस; गर्भवती महिलेचे पोट कापले आणि…

25
Israel Hamas War : हमासच्या दहशतवाद्यांकडून क्रूरतेचा कळस; गर्भवती महिलेचे पोट कापले आणि...

हमास आणि इस्त्रायल युद्धाला (Israel Hamas War) आज म्हणजेच मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी १८ दिवस झाले आहेत. पण, अद्यापही इस्रायल आणि हमासकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला, सर्वत्र मृतदेह विखुरले गेले, मालमत्तेचे नुकसान झाले, कुटुंबे उद्ध्वस्त झाली.

अशातच आता इस्रायलच्या वॉर रूमने ट्विटरवर हमासच्या (Israel Hamas War) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे भयानक दृश्य शेअर करण्यास सुरुवात केली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी कशाप्रकारे क्रूरतेचा कळस गाठला आहे हे यामधून समोर येत आहे.

हल्ल्यादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी एका गर्भवती इस्राइली (Israel Hamas War) महिलेलाही सोडले नाही. दहशतवाद्यांनी गर्भवती महिलेची आणि तिच्या पोटातील बाळाची क्रूरपणे हत्या केली आहे. इस्राइल डिफेन्स फोर्स (IDF) ने गर्भवती इस्राइली महिला आणि तिच्या न बाळाची हमासच्या अतिरेक्यांनी क्रूरपणे हत्या केल्याच्या घटनेची माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Bangladesh Train Accident : दोन ट्रेन एकमेकांवर आदळल्या; २० जणांचा मृत्यू)

दावा केला आहे की, हमासच्या अतिरेक्यांनी (Israel Hamas War) गर्भवती महिलेचे पोट फाडले आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचा शिरच्छेद केला. IDF ने पुढे सांगितले की, ते X(ट्विटर)च्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे घटनेचा फोटो शेअर करू शकत नाही.

तसेच दहशतवाद्यांनी (Israel Hamas War) पद्धतशीरपणे इस्त्रायली नागरिकांना पळून जाण्याचे सर्व मार्ग रोखले आणि त्यानंतर हिंसाचाराची लाट उसळली ज्यात लोकांना त्यांच्या गाड्यांमधून गोळ्या घालणे आणि वाहनांना आग लावणे देखील समाविष्ट होते. पायी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही (Israel Hamas War) लक्ष्य करण्यात आले. काहींनी पळून जाण्याचा अथक प्रयत्न केला. तेव्हा हमासच्या अतिरेक्यांनी शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गोळीबार केला, ज्यामुळे सुरक्षिततेचा कोणताही मार्ग उरला नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.