Coronavirus JN1 Variant : ‘जेएन १’ आजाराबाबत घाबरु नका, पण काळजी घ्या

कोविड १९ सदृश्य या आजाराचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असून गरज भासल्यास या प्रकाराच्या पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेव्हन हिल्स, कस्तुरबा रुग्णालयांसह इतर ठिकाणी आयसीयू खाटा उपलब्ध आहे.

1670
Coronavirus JN1 Variant : ‘जेएन १’ आजाराबाबत घाबरु नका, पण काळजी घ्या
Coronavirus JN1 Variant : ‘जेएन १’ आजाराबाबत घाबरु नका, पण काळजी घ्या

राज्यात कोरोनाचा जेएन१ (JN1 Variant) या नव्या उपप्रकाराचे रुग्ण आढळून येत असले तरी मुंबईमध्ये सध्या तरी घाबरण्याची गरज नाही. कोविड १९ (Covid 19) सदृश्य या आजाराचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असून गरज भासल्यास या प्रकाराच्या पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेव्हन हिल्स, कस्तुरबा रुग्णालयांसह इतर ठिकाणी आयसीयू खाटा उपलब्ध आहे. मात्र, सध्या तरी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नसून प्रत्येक नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत:च घेण्यासाठी मास्क लावण्याचा प्रयत्न करावा, परंतु मास्क लावणे बंधनकारक किंवा सक्तीचे नसेल असे महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. (Coronavirus JN1 Variant)

२२५० किट उपलब्ध, १ हजार किट राखीव

कोविड सदृश्य आजाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलतांना अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी काही राज्यामध्ये हे जेएन १ रुग्ण आढळून आले असले तरी महाराष्ट्रात या कोविडच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही केवळ १.९ टक्के एवढी आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात कोविडचा एक रुग्ण मृत्यू पावला होता, तर सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात एकाही रुग्णाचा मृत्यू नव्हता, तर डिसेंबर महिन्यात आजच्या तारखेपर्यंत एकूण ३४ रुग्ण आढळून आहेत. यासाठीच्या तपासणीसाठी आवश्यक २२५० किट उपलब्ध असून अतिरिक्त १ हजार किट राखीव साठा म्हणून आहेत. मुंबई सध्या १ हजार रुग्णांची तपासणी केली असून त्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही केवळ ५ टक्के एवढीच आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त तपासणीवर भर दिला जाणार आहे. (Coronavirus JN1 Variant)

(हेही वाचा – Myanmar : म्यानमारमधील विद्रोही गटाचे चिनी सीमेलगत एका चौकीवर नियंत्रण)

मास्क लावणे बंधनकारक किंवा सक्तीचे

मात्र, आजच्या परिस्थितीत तरी मुंबईतील या आजाराची परिस्थिती चिंताजनक नसून लोकांनीही जास्त घाबरुन जाण्याची गरज नाही, परंतु आपण स्वत: म्हणून याबाबत काळजी घेतली गेली पाहिजे असे आवाहन शिंदे यांनी केले. त्यामुळे ज्यांना या आजारांसंदर्भात लक्षणे दिसून येतील त्यांची तपासणी केली जाईल. या आजाराबाबत केंद्र सरकारचे प्रमाणे जे निर्देश येतील त्याप्रमाणे त्याचे पालन केले जाईल, परंतु सध्या तरी जनतेवर मास्क लावणे बंधनकारक किंवा सक्तीचे केले जाणार, परंतु लोकांनी स्वत: याचा वापर करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी कोविडकरता ज्या रुग्णालयांचा वापर केला होता त्यांचा वापर भविष्यात अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास केली जाईल, तसा अनुभव तसेच याबाबतचे साहित्य, सामुग्री उपलब्ध आहे, त्याचाही वापर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Coronavirus JN1 Variant)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.