Myanmar : म्यानमारमधील विद्रोही गटाचे चिनी सीमेलगत एका चौकीवर नियंत्रण

शान राज्याच्या उत्तरी भागातील कोकांग स्व-प्रशासित क्षेत्राची राजधानी लाउक्काइंग टाऊनशिपमध्ये असलेली ही आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौकी आहे. म्यानमारच्या सैन्याने २ वर्षांपूर्वी लोकशाही सरकारला पायउतार करून सत्तेची सूत्रे हाती घेतली होती.

179
Myanmar : म्यानमारमधील विद्रोही गटाचे चिनी सीमेलगत एका चौकीवर नियंत्रण
Myanmar : म्यानमारमधील विद्रोही गटाचे चिनी सीमेलगत एका चौकीवर नियंत्रण

म्यानमारच्या विद्रोही गटांसमोर देशाच्या सैन्याची पिछेहाट होत आहे. सध्या म्यानमारवर (Myanmar) लष्करी शासन आहे. त्याला चीनचेही (China) खुले समर्थन आहे. सैन्याच्या होत असलेल्या पराभवामुळे चिनी राष्ट्राध्यक्षही चिंतेत आहेत. विद्रोही गटांच्या या कृत्यांमुळे ‘म्यानमारचे सैन्य शासक मिन आंग ह्लाइंग (Min Aung Hlaing) यांचा पराभव होत आहे’, अशीही चर्चा चालू आहे.

(हेही वाचा – Agniveer Scheme : मनोज नरवणे यांचा पुस्तकातून अग्नीवीर योजनेविषयी खुलासा; म्हणाले केंद्र सरकारने…)

आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौकी

सशस्त्र विद्रोहींच्या गटाने चिनी सीमेशी लागून असलेल्या महत्त्वपूर्ण चौकीवर नियंत्रण मिळवले आहे. शान राज्याच्या उत्तरी भागातील कोकांग स्व-प्रशासित क्षेत्राची राजधानी लाउक्काइंग टाऊनशिपमध्ये असलेली ही आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौकी आहे. म्यानमारच्या सैन्याने २ वर्षांपूर्वी लोकशाही सरकारला पायउतार करून सत्तेची सूत्रे हाती घेतली होती. (Myanmar)

200 हून अधिक लष्करी चौक्या ताब्यात 

फेब्रुवारी 2021 मध्ये आंग सान सू की (Aung San Suu Kyi) यांच्या सरकारकडून लष्कराने सत्ता काबीज केल्यानंतर स्थापन झालेला हा लोकशाही समर्थक सशस्त्र गट आहे. त्यांनी आतापर्यंत 200 हून अधिक लष्करी चौक्या आणि चीनबरोबरच्या महत्त्वपूर्ण व्यापारावर नियंत्रण ठेवणारी ठिकाणे ताब्यात घेतली आहेत. त्यात म्यानमारचे शेकडो लष्करी जवान मारले गेल्याचे म्हटले आहेत.

(हेही वाचा – BMC : मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा शोध आता सॅटेलाईट इमेजेस प्रणालीच्या आधारे)

या लढाईमुळे सीमेपलीकडील व्यापार रोखला गेला आहे आणि बीजिंगमध्ये (Beijing) चिंता वाढली आहे. देशाच्या अनेक भागांत गृहयुद्धात अडकलेल्या चीनचा धोरणात्मक सहकारी असलेल्या म्यानमारमध्ये राजकीय अस्थिरता वाढण्याचा धोकाही यामुळे आहे. (Myanmar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.