
-
डोंबिवली, प्रतिनिधी
Dombivli इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया अर्थात ICAI तर्फे घेण्यात आलेल्या CA Final मे २०२६ परीक्षेत डोंबिवलीतील सोहन अनिल मांजरेकर याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. ६० पैकी ४७३ गुण मिळवत त्याने ७८.८३ टक्के गुणांसह All India Rank ३ मिळवली आहे. एकीकडे गुरूवारी जाहीर झालेल्या निकालानंतर सोहनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात झळकलेल्या सोहन मांजरेकर याने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. (Dombivli)
(हेही वाचा – ‘Operation Tiger’चा थरार; शिवसेनेच्या वर्धापन दिनी मुंबईत होणार मोठा राजकीय भूकंप!)
CA Final ही देशातील सर्वाधिक कठीण व्यावसायिक परीक्षांपैकी एक आहे. दोन्ही गट एकत्र देणाऱ्या २३,७६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३,३४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पासिंग टक्केवारी १४.०७ टक्के इतकी कमी आहे. अशा स्पर्धेत टॉप ३ मध्ये स्थान मिळवणे म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि कठोर मेहनतीची कमाल आहे. सोहनच्या या यशामुळे डोंबिवलीतील CA विद्यार्थ्यांसाठी नवा आदर्श निर्माण झाला आहे. (Dombivli)
(हेही वाचा – १९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा!; Hindu Janajagruti Samiti चे सर्व हिंदु संघटनांना आवाहन)
या परीक्षेत पटियालाच्या नूर सिंगलाने ४९ गुणांसह ८३.१७ टक्के मिळवत प्रथम क्रमांक मिळविला, तर हावड्याच्या रितीज सराफने ४७५ गुणांसह ७९.१७ टक्के मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. महाराष्ट्रातून टॉप ३ मध्ये स्थान मिळवणारा सोहन हा एकमेव विद्यार्थी ठरला असून त्यामुळे राज्याचा मान उंचावला आहे. २ ते १२ मे दरम्यान झालेल्या या परीक्षेत एकूण ७ हजार ९३१ विद्यार्थी चार्टर्ड अकाऊंटन्ट म्हणून पात्र ठरले. सोहनने मिळविलेल्या या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबई उपनगर आणि विशेषतः डोंबिवली परिसरात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत देशात अव्वल स्थान मिळवून सोहनने डोंबिवलीचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. (Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
