
-
कल्याण, प्रतिनिधी
कारगीलपासून २२० किमी बर्फाच्छादित प्रदेशात उणे पाच अंशात असलेल्या झंस्कार व्हॅलीतील अब्रान शाळेत डोंबिवलीच्या हम चॅरिटेबल ट्रस्टने आगळावेगळा उपक्रम राबविला. या शाळेला हमतर्फे लडाखमधील शाळेला सोलार प्रोजेक्ट अर्पण करण्यात आला. प्रकाशाचा सण असलेल्या दिपावलीच्या मुहूर्तावर डोंबिवलीच्या हम ट्रस्टने हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. (Dombivli News)
हम चॅरिटेबल ट्रस्टचे प्रवर्तक मनोज नशिराबादकर यांनी या प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल शाळेने त्यांचे आभार मानून कौतुक देखील केले. डोंबिवलीच्या हमने लडाखमधील झंस्कार व्हॅलीतील अब्रान या कारगिल जिल्हा केंद्रापासून २२० किमी दूर असलेल्या गावात BVN अब्रान येथील भारतीय विद्या निकेतन या पाचव्या इयत्तेपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळेत सोलर विद्युत पॅनल उभे केले आहेत. शुक्रवारी हमने टाटा सोलर कंपनीचा ५ किलो वॅट ताकदीचा सोलार प्रोजेक्ट अर्पण केला. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रम उणे ५ डिग्री तपमानामध्ये संपन्न झाला. तिकडे सध्या हिमवर्षाव सुरू झाला आहे. पाणीही गोठू लागले आहे. (Dombivli News)
(हेही वाचा – Kalyan Crime : डिलिव्हरी बॉयवर हल्ल्याची पुनरावृत्ती; कोळसेवाडी पोलिसांकडून त्रिकुटाचा शोध सुरू)
जूनमध्ये हमच्या टीमने या भागामध्ये दौरा केला होता. तेव्हा तिथे फक्त रात्री वीज पुरवठा चालू असायचा. सध्या तेथे वीजपुरवठा फक्त सायंकाळी ६ ते रात्री १० असतो. तेथील शाळेतील कामे पूर्ण करणे त्यामुळे खूप अवघड किंबहुना अशक्यच असते. त्यामुळे शाळेसाठी सोलर पॅनल बसवून देण्याचा प्रकल्प संस्थेने हाती घेतला. पुढील चार महिन्यांत निधी संकलन करुन हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. लडाख येथे हमचे प्रवर्तक मनोज नशिराबादकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान या प्रकल्पाला लाभले. (Dombivli News)
सोलर प्रोजेक्ट लोकार्पण सोहळ्यासाठी उत्तरक्षेत्र संगठन मंत्री विजय नड्डा उपस्थित होते. स्थानिक पंचायत समिती सदस्य स्टॅंझीन जिगमत तसेच भारतीय शिक्षा समितीचे कार्यकारिणी सदस्य मनोज नशिराबादकर उपस्थित होते. नड्डा यांनी हमचे आभार मानले व यामुळे व्हॅलीत बाहेरून (हिमाचल प्रदेश) येणारे शिक्षक तेथे थांबू शकतील. तसेच काँम्प्यूटर सारखे शिक्षण व्हॅलीतील मुलांना विना अडथळा मिळेल असा विश्वास त्यांनी प्रकट केला. याचवेळी शाळेमध्ये अँन्यूअल डे देखील साजरा झाला. मुलांचे विविध कार्यक्रम तर झालेच पण पालकांनी (महिला) सुद्धा आपला सहभाग नोंदवत एक लाडाखी डान्स प्रस्तुत केला. जोडो जम्मू-काश्मीर हे हमचे उद्दिष्ट आता विस्तारुन जोडो जम्मू-काश्मीर-लडाख असे झाले आहे. दीपावलीचा सण म्हणजे जीवन उजळवून टाकणाऱ्या प्रकाशाचा सणाच्या दिवशी आपल्यापासून शेकडो मैल दूर भारतवासीयांसाठी अजून एक प्रकल्प आपण पूर्ण केला, असे समाधान अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले. (Dombivli News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
