Dombivli News : कल्याण तहसीलदार कार्यालयात बाळाचा लाखात सौदा; दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

182
Police officers near a police vehicle in Dombivli.
Dombivli News : कल्याण तहसीलदार कार्यालयात बाळाचा लाखात सौदा; दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल
  • डोंबिवली, प्रतिनिधी 

आधी दोन वेळा गर्भपात झाला, यापुढे मुल झाल्यास जीविताला धोका म्हणून संदर्भात बालकाचे आई-वडील आणि अवैध पद्धतीने मुल दत्तक घेण्याच्या तयारीत असलेल्या दाम्पत्याच्या विरोधात टिटवाळ्याच्या तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ठाण्याच्या जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या चाईल्ड हेल्पलाईनद्वारे  मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने एक लाख रूपयांना विक्री करत असल्याची कबुली या बालकाच्या माता-पित्याने पोलिसांना दिली. (Dombivli News)

एक दाम्पत्य कल्याण तहसील कार्यालयात मुलाची दत्तक प्रक्रिया राबविण्यासाठी परस्पर कागदपत्रे तयार करण्यासाठी येणार असल्याची माहिती कळताच ठाणे जिल्हा सिटी चाईल्ड हेल्पलाईनच्या समन्वयक श्रद्धा नारकर यांनी तत्काळ कल्याण तहसील कार्यालय गाठले. तेथे एक दाम्पत्य त्यांच्या बाळाला दुसऱ्या दाम्पत्याला दत्तक देण्यासाठी उपस्थित असल्याचे लक्षात आले. हा प्रकार गंभीर असल्याने श्रद्धा नारकर यांनी स्थानिक महात्मा फुले चौक पोलीसांची मदत घेतली. बालकाचे वडील प्रविण अरुण ननवरे (३०) आणि आई पूजा (२९) हे दाम्पत्या कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या म्हारळ गावात राहते. पूजा हिने २६ सप्टेंबर रोजी मुलाला जन्म दिला. कोणतीही शासकीय दत्तक घेण्या-देण्याची कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण न करता बेकायदेशीररित्या ओळखीच्या विश्वास लहू कोळी (२८, पनवेल जि. रायगड) आणि त्यांची पत्नी हर्षदा (२८) या दाम्पत्याच्या ताब्यात १७ दिवसांच्या बाळाला दिले. त्या बदल्यात कोळी दाम्पत्याने ननवरे दाम्पत्याला २० हजार रुपये दिले. या दोन्ही दाम्पत्याच्या विरोधात टिटवाळ्याच्या तालुका पोलिस ठाण्यात ठाणे जिल्हा सिटी चाईल्ड हेल्पलाईनच्या समन्वयक श्रद्धा नारकर (४४) यांनी फिर्याद दाखल केली. सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी कोळी आणि ननवरे दाम्पत्याच्या विरोधात बालन्याय (बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम) २०१५ चे कलम ८०, ८१ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (Dombivli News)

(हेही वाचा – Kalyan : ‘कुणी निंदा… कुणी वंदा…’; दिबांच्या नावासाठी नागरिकांनी लढविली अनोखी क्लृप्ती)

बाळ डोंबिवलीच्या जननी आशिषकडे सुरक्षित

पोलिसांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर बाळाला दत्तक घेणाऱ्या कोळी दाम्पत्याने माहिती उघड केली. मुलगा न झाल्याने त्यांनी त्यांच्या ओळखीच्या दाम्पत्याकडून बाळाला घेण्याचे ठरवले. तर बाळाची विक्री करणाऱ्या दाम्पत्यानेही माहिती दिली. आर्थिक अडचणीमुळे, तसेच आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी बाळाचा सांभाळ करणे शक्य नसल्याने हे बाळ ओळखीच्या दाम्पत्याला देण्याचे ठरविले. त्याबदल्यात एक लाख रूपये घेण्याचे ठरले. त्यापैकी २० हजार रूपये स्वीकारल्याचेही ननवरे दाम्पत्याने कबूली दिली. बाळाचा जन्म २६ सप्टेंबर रोजी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये झाला. सद्या हे बाळ उल्हासनगरच्या जिल्हा बालकल्याण समितीने दिलेल्या निर्देशांनुसार डोंबिवलीतील जननी आशीष चॅरिटेबल ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Dombivli News)

नियमानुसार बाळ दत्तक घ्यावे. कायदेशीर प्रक्रिया करून बाळ दत्तक दिले जाते. याकरिता महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधावा, असे पालकांना आहावान आहे. रामकृष्ण रेड्डी (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, ठाणे)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.