विमान अपघाताच्या कारणाची माहिती देणार्‍या ब्लॅक बॉक्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

112

रस्त्यावर अनेक अपघात होत असतात. त्या अपघातामागचे कारण जाणून घेण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान उपलब्ध नाही. रस्त्यावरील कॅमेरे, अपघात पाहणारे आणि नंतर इनवेस्टिगेशन टीमवर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. विमान अपघाताच्या बाबतीत मात्र ब्लॅक बॉक्स (black box) मदतीला येतो. या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून विमानाच्या अपघाताचं कारण जाणून घेण्यास मदत होते.

( हेही वाचा : धक्कादायक! शाळेत स्नेहसंमेलन सुरू असताना शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग )

नेपाळमध्ये लॅंडिंग करताना विमानाला मोठा अपघात झाला आणि या अपघाताने सबंध जग हळहळलं. नेपाळमधील पोखरा येथे यति एअरलाइन्स एटीआर-७२ विमा क्रॅश झालं. या विमानात ४ क्रू सदस्य आणि ६८ प्रवासी होते. यामध्ये सर्वच प्रवाश्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची बातमी आली आहे. या अपघातामागचे कारण अद्याप कळलेले नाही. यावर आणखी तपास अपेक्षित आहे.

परंतु असं सांगितलं जात आहे की मनुष्याकडून घडलेल्या त्रुटीमुळे हा अपघात झाला आहे. आता तपास यंत्रणा यामागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ही यंत्रणा ब्लॅक बॉक्सचा शोध घेत आहे. या ब्लॅक बॉक्सद्वारे अपघातामागचं खरं आणि नेमकं कारण कळू शकणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? चला तर मग जाणून घेऊया…

एअरक्राफ्टमध्ये स्थित असणारा ब्लॅक बॉक्स अतिशय उपयुक्त उपकरण आहे. एअरक्राफ्ट आणि फ्लाईट पॅरामिटर्सची नोंद करणं हे ब्लॅक बॉक्सचं काम आहे. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये अनेक गोष्टींची नोंद होत असते. एअरस्पीड, अल्टीट्यूड, वर्टिकल एक्सलरेशन आणि फ्यूल फ्लोची नोंद होत असते. गंमत म्हणजे या बॉक्सचे नाव जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी या बॉक्सचा रंग केशरी असतो. हा बॉक्स विमानाच्या मागच्या बाजूला बसवण्यात येतो.

यामध्ये दोन कंपोनेंट्स असतात. पहिला एफडीआर म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा सीव्हीआर म्हणजे कॉकपीट वॉयस रेकॉर्डर. सीव्हीआर कॉकपीटमधील संवाद रेकॉर्ड करतो. म्हणजे पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्या मध्ये झालेल्या संवादाची नोंद होत असते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फ्रॅश झाल्यानंतरही ब्लॅक बॉक्स बर्‍याचदा नष्ट होत नाही. हा विमानाचा सर्वात मजबूत भाग मानला जातो.

आता एफडीआर मध्ये २५ तासापर्यंत फ्लाईट डेट स्टोअर होऊ शकतो तर सीव्हीआरची क्षमता केवळ २ तासांची आहे. या उपकरणाची क्षमता इतकी आहे की ११०० से तापमानात आणि २०,००० खोल पाण्यात दाब देखील सहन करु शकतं. आता हे उपकरण जर सापडलं तर अपघातामागचं खरं कारण समोर येऊ शकेल. गेलेले जीव जरी परत येऊ शकत नसले तरी भविष्यात असे अपघात टाळण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि हे सगळं ब्लॅक बॉक्स नावाच्या उपकरणाच्या मदतीने होऊ शकतं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.