Diwali 2023: दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान यंदाही हिमाचल प्रदेशात

२०१४ सालापासून ते दरवर्षी देशाच्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात.

92
Diwali 2023: दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान यंदाही हिमाचल प्रदेशात
Diwali 2023: दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान यंदाही हिमाचल प्रदेशात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशात जाऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते दरवर्षी दिवाळी (Diwali 2023) सीमेवर किंवा नियंत्रण रेषेवर भारतीय लष्करासोबत दिवाळी साजरी करतात.

२०१४ सालापासून ते दरवर्षी देशाच्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. त्यामुळे यंदाही त्यांनी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे सैन्यासोबत दिवाळी साजरी केली.

(हेही वाचा – PM Narendra Modi जवानांसोबत साजरी करणार दिवाळी)

याबाबत सोशल मिडियावर माहिती देताना त्यांनी ‘X’या समाजमाध्यावर पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आपल्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचलो. देशातील आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा विशेष सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो.’

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.