PM Narendra Modi जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

पंतप्रधान लष्करी परिषदेला संबोधितही करतील

60
PM Narendra Modi जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. पंतप्रधान मोदी जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

पंतप्रधानांची सैनिकांसोबत दिवाळी (PM Narendra Modi) साजरी करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षीही ते दिवाळीच्या निमित्ताने कारगिलला पोहोचले होते, जिथे त्यांनी भारतीय लष्कराच्या सैनिकांसोबत दिव्यांचा सण साजरा केला होता.

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

अशातच आज म्हणजेच रविवार १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटर म्हणजेच X मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, “देशातील आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा विशेष सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो.” (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Diwali 2023 : आता बिनधास्त खा दिवाळी फराळ!)

पंतप्रधान लष्करी परिषदेला संबोधित करणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) ज्योदिया येथील राख मुठी भागात लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी मिठाई खाण्याचा आनंद घेणार आहेत. दुपारी दिल्लीला परतण्यापूर्वी पंतप्रधान लष्करी परिषदेला संबोधितही करतील. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषा किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैनिकांमध्ये दिवाळी साजरी करत आहेत. यंदाही त्यांनी हे कायम ठेवलं आहे.

‘व्होकल फॉर लोकल’

8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकांना या दिवाळीत स्थानिक पातळीवर उत्पादित उत्पादने खरेदी करण्याचे आणि ‘नमो अॅप’ वर त्या उत्पादकाशी एक सेल्फी शेअर करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले होते, “या दिवाळीत आपण नमो अॅपवर ‘व्होकल फॉर लोकल‘ च्या माध्यमातून भारताची उद्योजकता आणि सर्जनशील भावना साजरी करूया.”

(हेही वाचा – Diwali 2023: रांगोळीचा कॅन्व्हास झाला ग्लोबल!)

ते म्हणाले होते, “स्थानिक पातळीवर बनवलेली उत्पादने खरेदी करा आणि नंतर नमो अॅपवर उत्पादन किंवा उत्पादकाशी एक सेल्फी शेअर करा. “तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला या उपक्रमात सामील होण्यासाठी आणि सकारात्मकतेची भावना पसरवण्यासाठी आवाहन करा “. स्थानिक प्रतिभेला पाठिंबा देण्यासाठी, भारतीयांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपली परंपरा समृद्ध ठेवण्यासाठी आपण डिजिटल माध्यमांच्या सामर्थ्याचा वापर करूया, असे पंतप्रधान म्हणाले. (PM Narendra Modi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.