BMC : अतिधोकादायक इमारतींचा वीज पुरवठा खंडित करा

येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी बैठक झाली.

247

मुंबईतील सी-१ श्रेणीतील धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केल्या असून या इमारतींमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीस बजावण्याच्या तसेच रहिवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्याही सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये धोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा खंडित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.

येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू,  बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक  लोकेश चंद्र,  मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,  मुंबई वाहतूक पोलीस सह आयुक्त प्रवीण पडवळ,  प्रभारी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे)  रमेश पवार, सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत, महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त  चंद्रशेखर चोरे,  हे उपस्थित होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी संगणकीय सादरीकरण केले.

(हेही वाचा BMC : मुंबईतील ९ मीटरपर्यंतच्या रस्त्यांची जबाबदारी विभागाच्या सहायक आयुक्तांची)

मुंबईत पूर्व उपनगरांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका आहे. याठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे काम विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त चहल यांनी दिले. खासगी इमारतींच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यासाठी धोरण निश्चिती करण्याचा विषय शासन पातळीवर प्रस्तावित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.