Delhi Winter : राजधानी गारठली… दिवसभर धुक्याची चादर

दिल्लीमध्ये डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्यातील प्रथम पंधरवडा प्रचंड थंडीचा असतो. मात्र सूर्यदेव दिवसा दुपारी तरी दर्शन देतो. पण यावर्षी दिवसभर धुक्यांचे साम्राज्य आहे. यामुळे कडाक्याच्या थंडीने दिल्लीकर त्रस्त झाले आहे.

136
Delhi Winter : कडाक्याची थंडी... भूकंपाचे धक्के.... धुकेच धुके आणि वाढते प्रदूषण; दिल्लीकरांच्या काळजीत वाढ
Delhi Winter : कडाक्याची थंडी... भूकंपाचे धक्के.... धुकेच धुके आणि वाढते प्रदूषण; दिल्लीकरांच्या काळजीत वाढ

दिल्लीमध्ये (Delhi) डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्यातील प्रथम पंधरवडा प्रचंड थंडीचा असतो. मात्र सूर्यदेव दिवसा दुपारी तरी दर्शन देतो. पण यावर्षी दिवसभर धुक्यांचे साम्राज्य आहे. यामुळे कडाक्याच्या थंडीने दिल्लीकर त्रस्त झाले आहे. शिवाय प्रदूषण देखील कमालीचे वाढले आहे. एकूणच प्रचंड थंडीने राजधानी वासियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवाय सर्दी, खोकला असलेल्यांची रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. दिल्लीला (Delhi) येणाऱ्या ट्रेन आणि विमान सेवा देखील सतत बाधित होत आहेत. यामुळे प्रवाशांचे देखील हाल होत आहेत. राजधानीतील थंडीने सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. (Delhi Winter)

(हेही वाचा – North Korea-U.S: इराणनंतर उत्तर कोरियाने केली हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी, काय होऊ शकतात परिणाम; वाचा सविस्तर…)

राजस्थानसह उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील १८ राज्यांमध्ये मंगळवारी, १६ जानेवारी सकाळ दाट धुक्याने उजाडली. हरियाणा, पंजाब आणि दिल्लीत (Delhi) धुक्याचा रेड अलर्ट आहे. दिल्लीत शून्य दृश्यमानतेमुळे हवाई आणि रेल्वे प्रवास मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. दिल्लीत आज ३० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. १०० हून अधिक उड्डाणे उशिराने आहेत. अनेक उड्डाणे जयपूर, मुंबईकडे वळवण्यात आली. या विलंबामुळे सोमवारी, १५ जानेवारी इंडिगोच्या विमानातही वाद पाहायला मिळाला. आज दिल्लीला (Delhi) पोहोचणाऱ्या ३० गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दुसरीकडे, हवामान खात्याने उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणामध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. अरुणाचल प्रदेशसह ईशान्येकडील राज्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित आहे आणि तापमानात घट होऊ शकते. (Delhi Winter)

लेहमध्ये पारा -९ डिग्री सेल्सियस आणि श्रीनगरमध्ये -५ डिग्री सेल्सियसवर

दिल्लीच्या (Delhi) सफदरजंग भागात मंगळवारी सकाळी ३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. जोरदार बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीर, लेह-लडाखसह डोंगराळ राज्यांमध्ये बर्फाची पांढरी चादर आहे. लेहमध्ये पारा -९°C, श्रीनगरमध्ये -५°C, मनाली २°C, शिमला ५°C, माउंट अबू ६°C, उत्तरकाशी २°C, डेहराडून ३°C, नैनिताल ४°C नोंदवण्यात आला. आजही डोंगरावर बर्फवृष्टीचा अंदाज आहे. (Delhi Winter)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.