Delhi Schools : दिल्लीत थंडीची लाट; आणखी पाच दिवस वाढवली शाळेची सुट्टी

आतिशी यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार आता सोमवारपासून केवळ शवीपासून पुढचे वर्ग सुरू होणार आहेत. पाचवीपर्यंतच्या वर्गांना आणखी पाच दिवस सुट्टी असणार आहे.

321
Delhi Schools : दिल्लीत थंडीची लाट; आणखी पाच दिवस वाढवली शाळेची सुट्टी

दिल्लीच्या शिक्षणमंत्रीआतिशी यांनी एक्स (ट्विटरवरील) एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, नर्सरी ते इयत्ता पाचवीच्या मुलांसाठी शाळा आणखी पाच दिवस बंद राहतील. दिल्लीतील थंड हवामानामुळे आता सोमवारपासून केवळ सहावी पासून पुढचे वर्ग सुरू होणार आहेत. पाचवीपर्यंतच्या वर्गांना आणखी पाच दिवस सुट्टी असणार आहे.  (Delhi Schools)

दिल्ली सरकारने दिलेल्या आदेशात थंडीची लाट आणि भारतीय हवामान खात्याच्या ‘यलो अलर्ट'(yellow alert) मुळे सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये हिवाळी सुट्टी १० जानेवारीपर्यंत वाढवली होती. मात्र, काही तासांतच सरकारने तो मागे घेतला. त्यानंतर रविवारी (७जानेवारी) सकाळी आतिशीनी ही घोषणा केली. (Delhi Schools)

(हेही वाचा : Ram Kadam vs Udhav Thackrey : कुठे गेली तुमची हिंदुत्वाची भाषा? उद्धव ठाकरे, संजय राऊत तुम्ही गप्प का? राम कदम यांचा उद्धव ठाकरेंना सवाल)

शनिवारी तापमानात मोठी घट 

दिल्ली, पूर्व राजस्थानचा काही भाग, वायव्य राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील तुरळक भागांमध्ये शनिवारी तीव्र थंडीचा दिवस होता.दिल्ली, पूर्व आणि वायव्य राजस्थानचा काही भाग, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागात कडाक्याची थंडी आहे. विविध स्थानकांवरील कमाल तापमानात वर्षाच्या या काळात सामान्य श्रेणीपेक्षा लक्षणीय घट दिसून आली.

भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये थंडीची स्थिती कायम राहण्याची आणि त्यानंतर त्यात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे (IMD)पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान ९-१२  अंश सेल्सिअसच्या आहे; आणि उत्तर राजस्थान, दिल्ली, वायव्य मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये १३-१६  अंश सेल्सिअस आहे . या भागात तापमान सामान्यपेक्षा ४-९  अंश सेल्सिअसने कमी आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.