Deep Fake Video of NSE CEO : शेअर बाजार सल्ल्यांमध्येही डीप फेक व्हिडिओंचं वाढतं प्रस्थ, स्वत:चा बचाव कसा कराल?

Deep Fake Video of NSE CEO : अलीकडेच एका डीप फेक व्हिडिओद्वारे राष्ट्रीय शेअर बाजाराचे सीईओ आशीष चौहान शेअर खरेदी विक्रीवर सल्ला देताना दिसले होते. 

175
Deep Fake Video of NSE CEO : शेअर बाजार सल्ल्यांमध्येही डीप फेक व्हिडिओंचं वाढतं प्रस्थ, स्वत:चा बचाव कसा कराल?
  • ऋजुता लुकतुके

शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणाऱ्यांसाठी या आठवड्यात एक धक्कादायक अनुभव आला. सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषकुमार चौहान हे काही व्हिडिओंमधून शेअर बाजारातील ट्रेडिंगवर चक्क सल्ले देताना दिसले. ज्यांनी हे व्हिडिओ खरे आहेत की खोटे याची शाहनिशा केली नाही, अशांनी नक्कीच या सल्ल्यानुसार खरेदी-विक्री केली असणार आहे. पण, हे व्हिडिओ डीप फेक तंत्रज्ञानाच्या वापरातून बनवले असल्याचं आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. (Deep Fake Video of NSE CEO)

बुधवारपासून आशीषकुमार चौहान यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली. पण, लागलीच राष्ट्रीय शेअर बाजाराने पत्रक काढून ते खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘सोशल मीडियावर फिरणारे व्हिडिओ हे एनएससीचे अधिकृत व्हिडिओ नाहीत. यात आशीष कुमार यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) वापरून काढलेला आवाज आणि चेहऱ्यावरील हुबेहूब हावभाव टिपून व्हिडिओंना तो इफेक्ट दिलेले हे खोटे व्हिडिओ आहेत. गुंतवणूकदारांनी अशा व्हिडिओपासून सावध राहावं,’ असं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. एनएससीच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला असे सल्ला देणारे व्हिडिओ बनवण्याची परवानगी नाही. तसंच ज्यांनी हे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर प्रसिद्ध केले त्यांना ते काढून टाकण्याची विनंती एनएसईकडून करण्यात येत आहे. (Deep Fake Video of NSE CEO)

(हेही वाचा – IPL 2024, GT bt RR : गुजरातचा कर्णधार शुभमन पंचांवर का चिडला?)

गुंतवणूकदारांनी काय खबरदारी घ्यायची? 

पण, या बाबतीत गुंतवणुकदारांनी नेमकी काय काळजी घ्यायची, हा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. त्यासाठी व्हिडिओचा स्त्रोत तपासून पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आशीषकुमार किंवा एनएसईला असा व्हिडिओ प्रसारित करायचा असता तर त्यांनी तो nseindia.com या अधिकृत वेबसाईटवर प्रसारित केला असता. सरसकट कुठल्याही सोशल मीडिया वाहिनीवर तो नक्कीच प्रसारित केला नसता. त्यामुळे आपण बघत असलेल्या वाहिनीची विश्वासार्हत तपासणं खूप आवश्यक आहे. स्त्रोत हा अधिकृत हवा. (Deep Fake Video of NSE CEO)

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सेबीनेही (SEBI) गुंतवणूकदारांना इशारा दिला होता. स्टॉक ब्रोकरनी युट्यूब इन्फ्युएन्सर बरोबर काम करू नये असा इशाराही सेबीने दिला आहे. त्यामुळे इन्फ्ल्युअन्सरकडून आलेले व्हिडिओ गुंतवणुकदारांनीही शक्यतो टाळायला हवेत. डीप फेक व्हिडिओंच्या (Deep Fake Video) बाबतीत कंपन्या वेळोवेळी देत असलेलं स्पष्टीकरण गुंतवणुकदारांनी लक्ष ठेवून ऐकलं पाहिजे. कारण, गेल्यावर्षी आयसीआयसीआय कंपनीनेही आपल्या एका अधिकाऱ्याचा डीप फेक व्हिडिओ केल्याची तक्रार केली होती. केंद्र सरकार सोशल मीडियावरील शेअर बाजार विषयक माहिती आणि मजकूर नियंत्रित करण्यावर धोरण आखत आहे. पण, तोपर्यंत गुंतवणूकदारांनीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. (Deep Fake Video of NSE CEO)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.