Dadar Vanita Samaj : दादरच्या वनिता समाज संस्थेच्या भाडेकराराचे अखेर नुतनीकरण होणार, सन २०४७ पर्यंत भाडेकरारात वाढ

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर असलेल्या वनिता महिला समाज विश्वस्त संस्थेला देण्यात आलेल्या जागेचे भाडेपट्टा करण्यास महापालिकेने तयारी दर्शवली आहे.

719
Dadar Vanita Samaj : दादरच्या वनिता समाज संस्थेच्या भाडेकराराचे अखेर नुतनीकरण होणार, सन २०४७ पर्यंत भाडेकरारात वाढ
Dadar Vanita Samaj : दादरच्या वनिता समाज संस्थेच्या भाडेकराराचे अखेर नुतनीकरण होणार, सन २०४७ पर्यंत भाडेकरारात वाढ
  • सचिन धानजी, मुंबई

दादर (Dadar) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर असलेल्या वनिता महिला समाज विश्वस्त संस्थेला (Dadar Vanita Samaj Sanstha) देण्यात आलेल्या जागेचे भाडेपट्टा करण्यास महापालिकेने तयारी दर्शवली आहे. मागील सन २०१७ मध्ये वनिता महिला समाज विश्वस्त दिलेल्या जागेचा भाडेकर संपुष्टात आला होता. त्यामुळे या संस्थेकडून नव्याने भाडेकराराचे नूतनीकरण करण्याची मागणी होत होती. पण आता तब्बल आठ वर्षांनी भाडेकराराचे नूतनीकरण करण्यास महापालिकेनं अनुकूलता दर्शवली असून १ मे २०४७ पर्यंत या संस्थेचा भाडेकरार नव्याने वाढवण्यात येणार असल्याने ही जागा आता या संस्थेकडून कायम राहणार आहे. (Dadar Vanita Samaj)

दादर पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गवर असलेला नगर भूकर क्र.८/४९७ हा सुमारे ३९५३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूभाग वनिता समाज या संस्थेस १४ फेब्रुवारी १९३९ च्या सुधार समिती मंजुरीनुसार मे १९६२ पर्यंत २५ वर्षांच्या कालावधीकरता प्रति महिना १ रुपये एवढे भूभाडे आकारून भाडे कराराने देण्यात आला होता. त्यानुसार सन १९६२ ते १९८७ या २५ वर्षांच्या कालावधीसाठी आणि त्यानंतर १९८७ ते २०१७ पर्यंत हा भाडेकरार करण्यात आला होता.परंतु हा भाडेकरार २०१७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर नवीन भाडेकरार हा अद्याप करण्यात आला नव्हता. यासाठी सन २०१८ पासून वारंवार वनिता समाज संस्थेकडून (Vanita Samaj Sanstha) भाडेकरार नुतनीकरण करण्यासंदर्भात महापालिकेशी पाठपुरावा सुरु आहे. दरम्यान, कोविड काळात याच जागेत कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले होते. मात्र, आता महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) आता या वनिता समाज संस्थेला (Vanita Samaj Sanstha) पुढील ३० वर्षांकरता ही जागा भाडेकरारावर देण्याची तयारी दर्शवून भाडेकरार करण्यास अनुमती दर्शवली असल्याची माहिती मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Dadar Vanita Samaj)

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; 13 जणांचा मृत्यू)

मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संस्थेला ग्रंथालय, वाचनालय इतर मनोरंजनाच्या सवलती, मराठी व इंग्रजीचे वर्ग चालविणे. व्याख्यानमाला, मेळावा व इतर शैक्षणिक कार्यक्रम, चित्रपट रिळाचे प्रदर्शन, विणकाम व शिवणकामाचे वर्ग व कार्यशाळा, स्त्रियांना नोकरी उपलब्ध करून देण्याकरीता व्यवसाय उपयोगी कामे शिकवणे आणि लग्न व याच प्रकारच्या कार्याकरीता सभागृह भाड्याने देणे या वापराकरीता पुढील ३० वर्षांकरता ही जागा भाडेकरारावर दिली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक दहा वर्षांनी भाडे पट्ट्यात १० टक्क्यांनी वाढ करण्यात येईल अशाप्रकारचा निर्णय घेतला असून लवकरच याचा मसुदा तयार करून प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याचे मालमत्ता विभागाने स्पष्ट केले. (Dadar Vanita Samaj)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.