Dabur च्या ‘या’ उत्पादनांवर बंदी; शंभर टक्के शुद्धतेचा दावा ठरला दिशाभूल करणारा

122

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) प्रसिद्ध डाबर (Dabur) कंपनीच्या अनेक खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. उत्पादनांवर ‘शंभर टक्के शुद्ध’ किंवा ‘शंभर टक्के नैसर्गिक’ असे दावे छापणे ग्राहकांची दिशाभूल करणारे आणि अस्पष्ट असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. या संदर्भात नियामक संस्थेने डाबर इंडिया लिमिटेडला (Dabur India Ltd) तात्काळ अशा सर्व उत्पादनांची विक्री थांबवण्याचे आणि १५ दिवसांच्या आत स्पष्टीकरण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (Dabur)

(हेही वाचा – FDA Action : अन्न सुरक्षा मोहिमेला मोठा प्रतिसाद! अवघ्या १५ दिवसांत २ हजार तक्रारी दाखल; ‘हा’ जिल्हा राज्यात आघाडीवर )

नियमांचे उल्लंघन आणि कारवाईखाली आलेली उत्पादने
अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या पाहणीनुसार, कंपनीच्या संकेतस्थळावर ‘शंभर टक्के सेंद्रिय’, ‘शंभर टक्के शुद्धतेची हमी’ आणि ‘शंभर टक्के नारळ पाणी’ अशा प्रकारच्या जाहिराती केल्या जात होत्या. ही बाब २०१८ च्या अन्न सुरक्षा आणि जाहिरात नियमांचे थेट उल्लंघन करणारी आहे. या कारवाईमध्ये डाबर चे मध, गाईचे तूप, खाण्याचे तेल, अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तीळ तेल आणि नारळाचे दूध यांसारख्या अनेक प्रमुख खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

(हेही वाचा – JPSC परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात झारखंड CID ची मोठी कारवाई; राज्यभरातील १८ ठिकाणी छापेमारी )

सेंद्रिय प्रमाणपत्राचा गैरवापर आणि प्रशासकीय निर्देश
तपासणी दरम्यान असेही आढळून आले की, डाबरच्या सेंद्रिय मधात आणि सिरक्यामध्ये वैध परवानगी नसतानाही ‘जैविक भारत’ हे चिन्ह वापरले गेले होते. याशिवाय, मिश्र खाद्यपदार्थांवर शंभर टक्के शुद्धतेचा दावा करण्याची कायद्यात तरतूद नाही. यापूर्वी कंपनीला इशारा देऊनही योग्य ती सुधारणा न केल्यामुळे प्राधिकरणाने हे कठोर पाऊल उचलले आहे. सध्या अन्न सुरक्षा प्राधिकरण ग्राहक संरक्षणासाठी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर देशभर कडक कारवाई करत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.