FDA Action : अन्न सुरक्षा मोहिमेला मोठा प्रतिसाद! अवघ्या १५ दिवसांत २ हजार तक्रारी दाखल; ‘हा’ जिल्हा राज्यात आघाडीवर 

125
Tukaram Mundhe: बिकेसीमधील 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या क्लबवर एफडीएची कारवाई; रेस्टॉरंट तात्पुरते बंद
Tukaram Mundhe: बिकेसीमधील 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या क्लबवर एफडीएची कारवाई; रेस्टॉरंट तात्पुरते बंद

महाराष्ट्र राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात भेसळखोर आणि नियमबाह्य हॉटेल चालकांविरोधात अत्यंत तीव्र मोहीम राबवली जात आहे. या धडक मोहिमेला नागरिकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत असून, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांतच विभागाकडे तब्बल दोन हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या जनसामान्यांच्या तक्रारींच्या आधारे प्रशासन दूषित अन्न आणि आरोग्याला घातक असणाऱ्या आस्थापनांवर कडक कायदेशीर कारवाई करत आहे. (FDA Action)

(हेही वाचा – Hardik Pandya ने तिरुपतीमध्ये केसांचे दान का केले? जाणून घ्या या प्राचीन परंपरेमागील अर्थ)

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून राज्यभरात तपासणीची धडक मोहीम सुरू आहे. याच संदर्भात जुलै महिन्याच्या १५ दिवसांत २ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर प्राप्त तक्रारींमध्ये पुणे जिल्हा अव्वल असून, त्याखालोखाल मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्याचा क्रमांक लागतो.

अस्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती
सुमारे १ हजार तक्रारींवर सध्या तपास आणि कारवाई सुरू असून, उर्वरित तक्रारींची पडताळणी आणि निपटारा अन्न आणि औषध विभाग टप्प्याटप्प्याने करत आहे. तसेच तक्रारींची तत्काळ दखल घेण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे ४०० तक्रारींवरील तपास व आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. अस्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, चुकीचे लेबलिंग, मुदतबाह्य उत्पादन, दूध व दुग्धजन्य भेसळ आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन न करणे, अशा स्वरूपाच्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.

(हेही वाचा – Air India Flight : हवेतच घडला थरार! एअर इंडियाचे विमान अचानक हादरले, 134 प्रवाशांचा जीव टांगणीला; पुढे काय घडले?)

सर्वसामान्य नागरिकांना तक्रार करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तक्रार नोंदणी प्रणाली अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली आहे.  नागरिकांना तक्रार करणे सुलभ व्हावे यासाठी एआय आधारित तक्रार प्रणाली सुरू करण्यात आली असून, त्याचा नागरिकांकडून चांगला वापर होत आहे. लोकांमध्ये अन्नसुरक्षेबाबत आणखी जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. तक्रारींवर कार्यवाही केली जात आहे. असे विधान आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.