Air India Flight : हवेतच घडला थरार! एअर इंडियाचे विमान अचानक हादरले, प्रवाशांसोबत पुढे काय घडले?

या अचानक बसलेल्या धक्क्यामुळे विमानाची उंची काही क्षणांत सुमारे 300 फूटांनी घसरल्याची माहिती समोर आली आहे

122
AIR INDIA: फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या मुख्य वैमानिकांची ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह, तातडीने कारवाई करण्याची शिफारस
AIR INDIA: फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या मुख्य वैमानिकांची ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह, तातडीने कारवाई करण्याची शिफारस

Air India Flight : थायलंडमधील फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मंगळवारी (4 ऑगस्ट) प्रवासादरम्यान तीव्र टर्ब्युलन्सचा (हवेतील अस्थिरता) सामना करावा लागला. या अचानक बसलेल्या धक्क्यामुळे विमानाची उंची काही क्षणांत सुमारे 300 फूटांनी घसरल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत काही प्रवासी आणि विमानातील केबिन क्रू सदस्य जखमी झाले असून, विमानाने मात्र दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले.

नेमकं काय घडलं?

एअर इंडियाचे AI2379 हे विमान फुकेटहून दिल्लीकडे येत असताना क्रूझ टप्प्यात अचानक तीव्र टर्ब्युलन्समध्ये सापडले. प्राथमिक माहितीनुसार, जोरदार हवेच्या प्रवाहामुळे किंवा अपड्राफ्ट-डाउनड्राफ्टमुळे विमानाची उंची क्षणभरात सुमारे 300 फूटांनी कमी झाली. या अचानक धक्क्यामुळे सीटवरून उडाल्याने काही प्रवासी आणि केबिन क्रू सदस्यांना दुखापत झाली.

हेही वाचा: Jammu Kashmir Alert : दहशतवाद्यांकडून वाढत्या ‘टारगेट किलींग’च्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेत मोठी वाढ

प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत सुमारे 12 ते 14 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये प्रवासी आणि केबिन क्रू सदस्यांचा समावेश आहे. काहींना किरकोळ खरचटले, तर एका केबिन क्रू सदस्याला तुलनेने गंभीर दुखापत झाल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र, एअर इंडियाने नंतर जारी केलेल्या निवेदनात कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसून, वैद्यकीय तपासणीची गरज असलेल्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावरील वैद्यकीय केंद्रात नेण्यात आल्याचे स्पष्ट केले.

दिल्लीत सुरक्षित लँडिंग

टर्ब्युलन्सचा धक्का बसल्यानंतरही वैमानिकांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत विमानाचे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. विमान उतरल्यावर सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर आले. जखमींची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

टर्ब्युलन्स म्हणजे वातावरणातील हवेच्या प्रवाहात अचानक होणारे बदल. यामुळे विमानाला जोरदार धक्के बसू शकतात किंवा उंचीत अचानक चढ-उतार होऊ शकतात. अशा परिस्थितीत सीट बेल्ट बांधून ठेवण्याच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बहुतेक वेळा टर्ब्युलन्समुळे विमानाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत नाही, मात्र सीट बेल्ट न लावलेल्या प्रवाशांना दुखापत होण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा: India Pakistan Border : स्वातंत्र्यदिनापूर्वी भारत-पाक सीमेवर खळबळ; जवानांनी उधळला पाकिस्तानचा कट

एअर इंडियाचे अधिकृत स्पष्टीकरण

एअर इंडियाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, AI2379 या विमानाला प्रवासादरम्यान अल्पकाळ टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला, ज्यामुळे विमानाच्या उंचीत क्षणिक बदल झाला. मात्र विमान सुरक्षितपणे दिल्लीत उतरले असून, सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. किरकोळ दुखापत झालेल्या काही जणांना खबरदारी म्हणून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

हेही पाहा: 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.