राज्याला धोक्याची घंटा! रुग्ण संख्या ५० हजाराच्या पार 

बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली.

67

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यासाठी चिंता वाढवणारे वृत्त समोर आले आहे. कालपर्यंत राज्यात कोरोनाची सक्रिय रुग्ण संख्या ३० ते ३५ हजारच्या खाली असायची आता तिने थेट ५० हजाराचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सणासुदीत कोरोनाचा संसर्ग वाढू न देण्याची नितांत गरज आहे.

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली 

राज्याच्या आरोग्य विभागाने गुरुवारी त्या दिवसाची धक्कादायक आकडेवारी जारी केली. त्यावरून राज्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे कालपर्यंत नवीन रुग्ण संख्येपेक्षा अधिक बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असायची त्यामुळे सक्रिय रुग्ण संख्या कमी होती, परंतु आता बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. राज्यात दिवसभरात ४ हजार २१९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात फक्त २,५३८ रुग्ण बरे झाले, त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार २२९ वर पोहोचली.

(हेही वाचा : गणेशोत्सवात मुंबईत लागू होणार जमावबंदी… मुंबई पोलिसांचे आदेश नक्की वाचा)

ऑक्टोबरमध्येच कोरोनाची तिसरी लाट?

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या अहवालानुसार ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. जर देशात लसीकरणाचा वेग आणखी वाढवला नाही तर तिसऱ्या लाटेत संक्रमित लोकांची संख्या दररोज ६ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.