Corona : राज्यात कोरोनाचे नवे १७२ रुग्ण; मुंबईत ३२ नवे रुग्ण

JN .1 या करोना उपप्रकाराची (Sub variant )लागण झालेला एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही.

164
Corona : राज्यात कोरोनाचे नवे १७२ रुग्ण; मुंबईत ३२ नवे रुग्ण

राज्यात शनिवारी कोरोना चे  नवे १७२ रुग्ण आढळून आले. त्यात ३२ मुंबईतील आहेत. राज्यात आतापर्यंत ६१३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या १४८ आहे. शनिवारी ३८ करोनाबाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. JN .1 या करोना उपप्रकाराची (Sub variant )लागण झालेला एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही. (Corona)
मुंबईत आढळलेल्या ३२ रुग्णांपैकी तीन जणांना शनिवारी रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरीता राखीव असणाऱ्या ४२१५ पैकी १४ बेडसवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात ५७० चाचण्या करण्यात आल्या. शनिवारी( ३० डिसेंबर) जे एन १ चे १९ नवे रुग्ण सापडले. सध्या राज्यात एकूण जे एन १चे २९ रुग्ण झाले. पुणे जिल्ह्यामध्ये १२, बीड जिल्ह्यात ३, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ रुग्ण सापडले. (Corona)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.