१ फेब्रुवारीपासून थकीत मालमत्ता करदात्यांवर जप्तीची कारवाई

105

अमरावती शहरातील थकीत करदात्यांना मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता ३१ जानेवारीची डेडलाइन देण्यात आली आहे. अन्यथा १ फेब्रुवारीपासून मालमत्ता जप्तीची कारवाई करू, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

महापालिकेच्या वतीने थकीत मालमत्ता करधारकांकरिता करात सुट देणाऱ्या विविध योजना सुरू आहे. यामध्ये मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांनी ३१ जानेवारीपर्यंत आपल्या मालमत्ता करांची थकीत रक्कम आणि २५ टक्के शास्तीचा रक्कम भरणा केल्यास त्यांना ७५ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात शास्तीच्या रक्कमेवर सूट मिळणार आहे. सूट ही फक्त ३१ जानेवारीपर्यंतच लागू राहणार आहे.

महानगरपालिकेच्या संकलन केंद्रावरही रोख, धनादेश, धनाकर्ष, क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातूनही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता महानगरपालिकेची कर संकलन केंद्र शनिवार आणि रविवार सुरू ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा ३१ जानेवारीपर्यंत न केल्यास १ फेब्रुवारीपासून मालमत्ता जप्तीची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. पुनर्गणणे अंती मालमत्ता कराची रक्कम आणि सवलत वगळून उर्वरित दंडात्मक रक्कम एकाचवेळी भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी केले आहे.

(हेही वाचा – शिक्षण विभागात लाच घेताना सापडल्यास थेट निलंबन; शिक्षण आयुक्तांचा मोठा निर्णय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.