-
कल्याण, प्रतिनिधी
KDMT केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून २०७ इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत. यातील १० बसेस महापालिकेच्या परिवहन उपक्रम ताफ्यात दाखल झाल्या आहे. या बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. हे स्टेशन उभारण्याचे काम येत्या महिन्या अखेर पूर्ण झाल्यानंतर या बसेस रस्त्यावर धावणार असल्याची माहिती केडीएमटीकडून देण्यात आली. (KDMT)
प्रदूषण कमी करण्यासह पर्यावरण संवर्धनाचा विचार करून केंद्र शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना इंधनावर धावणाऱ्या बसेसची संख्या हळूहळू कमी करून विद्युत यंत्रणेवर धावणाऱ्या बस सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. केडीएमटी हा कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनासाठी कायम पांढरा हत्ती ठरला आहे. (KDMT)
(हेही वाचा – US Iran War : अमेरिका, इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोंदींनी घेतला देशाच्या सुरक्षिततेचा आढावा)
परिवहनच्या बसेस पुरेशा सेवा देण्यास असमर्थ ठरत असल्याने रिक्षावाल्यांची मुजोरी वाढत चालली आहे. त्यासाठीच कल्याण-डोंबिवलीकर प्रवाशांना किफायतशीर दरात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निधी द्यावा, यासाठी पाठपुरावा सुरू असतानाच केंद्र सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून केडीएमसीला निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून परिवहनकडून २०७ बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. (KDMT)
यातील १० बसेस दिवाळीपूर्वीच दाखल झाल्या असून या बसेस वसंत व्हॅली येथे उभ्या आहेत. उर्वरित पहिल्या टप्प्यातील बसेस मार्च अखेरपर्यंत आणल्या जाणार आहेत. या बसेससाठी चार्जीग स्टेशन उभारण्याचे काम देखील सुरू असून डिसेबर अखेरीस चार्जीग स्टेशन कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती केडीएमटीकडून देण्यात आली. ही चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर परिवहनच्या ताफ्यात दाखल झालेल्या बसेस रस्त्यावर उतरविण्यात येणार आहेत. (KDMT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

