Cold Wave Alert : उत्तर भारतासह या ठिकाणी ‘कोल्ड वेव अलर्ट’ जारी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशातील विविध भागांत पुढील ३ दिवसात थंडी वाढण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि सिक्किममध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.

223
Cold Wave Alert : उत्तर भारतासह या ठिकाणी 'कोल्ड वेव अलर्ट' जारी

सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. तर, मध्य भारतातील नागरिकांना धुक्यासह थंडीचा (Cold Wave Alert) सामना करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये कोल्ड वेव्ह अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि पूर्वोत्तर भारतात काही ठिकाणांवर हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(हेही वाचा – Iran-Pakistan Conflict : पाकिस्तानचा इराणवर प्रतिहल्ला; हवाई हल्ल्यात ७ दहशतवाद्यांचा मृत्यू)

पुढील ३ दिवसात थंडी वाढण्याची शक्यता –

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशातील विविध भागांत पुढील ३ दिवसात थंडी वाढण्याची (Cold Wave Alert) शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि सिक्किममध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्येही थंडी कायम राहणार आहे. तसेच तामिळनाडूच्या दक्षिण भागांमध्ये आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. (Cold Wave Alert)

(हेही वाचा –  Ind vs Afg 3rd T20 : रोहित शर्माच्या नावावर टी-२० तील ‘हा’ अनोखा विक्रम)

‘या’ ठिकाणी थंडीचा प्रकोप – 

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरमध्येही थंडीचा प्रकोप (Cold Wave Alert) वाढणार आहे. तसेच शीतलहरींमुळे महाराष्ट्रही गारठणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि नजीकच्या परिसरात किमान तापमान २० अंशांहूनही कमी तापमान नोंदवण्यात आले आहे. तर, कमाल तापमानाचा आकडाही ३० अंशांपेक्षा कमी झाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.