Coastal Road : कोस्टल रोडच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला ? कधी येणार मुंबईकरांच्या सेवेत ?

210
Coastal Road Project अंशत: खुला, पण माजी महापालिका आयुक्त सुबोध कुमारांचा पडला महापालिकेला विसर

मुंबईच्या (Mumbai) दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख समोर येत आहे. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या (Shivjayanti) निमित्ताने महाराष्ट्रात येणार आणि त्यांच्या हस्ते या विकासप्रकल्पांचे लोकार्पण होणार, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र या दिवशी विकासप्रकल्पांचे लोकार्पण होऊ शकलेले नाही. (Coastal Road)

(हेही वाचा – Congress : काँग्रेसचा हिंदुद्वेष; कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंदू मंदिरांवर लावणार ‘झिजिया कर’)

या प्रकल्पाचे उद्घाटन फेब्रुवारीअखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 27 फेब्रुवारी, 29 फेब्रुवारी किंवा 3 मार्च यांपैकी एका तारखेला होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार यातील एक दिनांक निश्चित होऊ शकतो.

कोस्टल रोड प्रकल्पाचे 85 टक्केपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंत 4 लेन सुरु करण्यात येणार आहेत. मे 2024 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे.

कोस्टल रोड कसा असेल ?

मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा एक 10.58 किमीपर्यंतचा पहिला टप्पा या उद्घाटनानंतर सुरू होणार आहे. या रोडच्या माध्यमातून 10 किमीपर्यंतचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या मार्गावर वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंत 100 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. आगीच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी शकार्डो सिस्टमदेखील लावण्यात येणार आहे. (Coastal Road)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.