Satyapal Malik यांच्या घरासह ३० ठिकाणी सीबीआयची धाड

यापूर्वी देखील सत्यपाल मलिक यांच्या घर आणि कार्यालयात सीबीआयने छापेमारी केली होती. सीबीआयने मे २०२३ मध्ये १२ ठिकाणी छापेमारी केली होती.

134
Satyapal Malik यांच्या घरासह ३० ठिकाणी सीबीआयची धाड

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्या दिल्लीतील घरावर आज, (गुरुवार, २२ फेब्रुवारी) सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने जम्मू-काश्मिरातील किरू जलविद्युत प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई केली आहे. यापूर्वी सीबीआयने विमा घोटाळ्याप्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई केली होती.

(हेही वाचा – Smita Thackeray : बाळासाहेब मला राज्यसभेवर पाठवणार होते; पण…; स्मिता ठाकरेंनी मुलाखतीमध्ये संवेदनशील विषयांवर केले भाष्य)

सीबीआयचे देशभरात ३० ठिकाणी छापे –

सीबीआयने देशभरात ३० ठिकाणी छापे टाकले आहेत. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे मारण्यात आलेत. उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा आणि मुंबई इथे या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी हे छापे मारण्यात आलेत. किश्तवाडमधील या प्रकल्पाच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी ३०० कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला असा आरोप मलिक यांनी केला होता. किरू जलविद्युत परियोजना (६२४ मेगावाट), एक रन-ऑफ-रिवर योजना, जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा जिल्ह्यात चिनाब नदीवर प्रस्तावित होणार आहे. प्रकल्पामध्ये प्रत्येकी १५६ मेगावॅट क्षमतेच्या ४ युनिट्ससह १३५ मीटर उंच धरण आणि भूमिगत वीजगृह बांधण्याची कल्पना आहे. (Satyapal Malik)

(हेही वाचा – J P Nadda : लोकसभेची लढाई ही मोठ्या फरकाने जागा निवडून आणण्यासाठी)

सीबीआयने मे २०२३ मध्येही १२ ठिकाणी छापेमारी केली –

दरम्यान, किरू हाइड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट कॉन्ट्रैक्ट संदर्भात सीबीआयने छापा मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील सत्यपाल मलिक यांच्या घर आणि कार्यालयात सीबीआयने छापेमारी (Satyapal Malik) केली होती. सीबीआयने मे २०२३ मध्ये १२ ठिकाणी छापेमारी केली होती. सीबीआयने त्यावेळी सौनक बाली यांच्या घरी छापेमारी केली होती. बाली हे सत्यपाल मलिक यांचे माध्यम सल्लागार राहिले आहेत. आता सीबीआयनं किरू हाइड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट संदर्भात ३० ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये सत्यपाल मलिक यांच्या घराचा आणि कार्यालयाचा समावेश आहे.(Satyapal Malik)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.