Congress : काँग्रेसचा हिंदुद्वेष; कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंदू मंदिरांवर लावणार ‘झिजिया कर’

याआधी येथे श्री हनुमंताचा उंच ध्वज सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार न करता तो ध्वज खाली उतरवला होता.

343
कर्नाटक सरकारने (Congress)  बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी हिंदू धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट विधेयक मंजूर केले. या विधेयकांतर्गत राज्यातील ज्या हिंदू मंदिरांचे उत्पन्न १ कोटींपेक्षा जास्त आहे, त्यांच्या उत्पन्नाच्या १० टक्के रक्कम सरकारी कर म्हणून जमा करावा लागणार आहे.
या विधेयकाबाबत भाजपने कर्नाटक सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा म्हणाले की, सरकार हिंदुविरोधी धोरण अवलंबत आहे. या विधेयकाद्वारे सरकार (Congress) हिंदूंच्या मंदिरांच्या पैशावर सरकारची रिकामी झालेली  तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार केवळ हिंदू मंदिरांकडूनच महसूल का गोळा करत आहे? इतर धार्मिक स्थळांकडून हा कर वसूल का करत नाही?, असा सवाल येडियुरप्पा यांनी केला. कोट्यवधी भाविकांच्या मनात एकच प्रश्न आहे की केवळ हिंदू मंदिरांनाच का लक्ष्य केले गेले, इतर धार्मिक स्थळांच्या महसुलाचाही सरकारी तिजोरी भरण्यासाठी का वापर करत नाही?

श्री हनुमंताचा उंच ध्वज सरकारने उतरवलेला 

कर्नाटकात सत्ताबदल होऊन काँग्रेसची (Congress) सत्ता येताच या ठिकाणी सरकारकडून हिंदू विरोधी निर्णय घेतले जाऊ लागले आहेत. याआधी येथे श्री हनुमंताचा उंच ध्वज सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार न करता तो ध्वज खाली उतरवला होता. तसेच मशिदीतील मौलानानांना वेतन सुरु केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.