China Bans iPhone : चीनने खरंच आयफोनवर बंदी आणली आहे का? 

सरकारी संस्था आणि कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आयफोन न वापरण्याचा इशारा दिल्याची बातमी आहे. 

162
China Bans iPhone : चीनने खरंच आयफोनवर बंदी आणली आहे का? 
China Bans iPhone : चीनने खरंच आयफोनवर बंदी आणली आहे का? 
  • ऋजुता लुकतुके

सरकारी संस्था आणि कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आयफोन (iPhone) न वापरण्याचा इशारा दिल्याची बातमी आहे. (China Bans iPhone)

तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा उत्पादक आणि ग्राहक देश असलेल्या चीनमध्ये एक मोठी घडामोड सध्या सुरू आहे. ब्लुमबर्गने अलीकडेच एक बातमी दिली आहे की, चिनी सरकारी कंपन्या आणि संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना आयफोन (iPhone) वापरू नका असं सांगत आहेत आणि अशा कंपन्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. (China Bans iPhone)

(हेही वाचा – Parliament Security : संसद सुरक्षाभंग प्रकरण; केंद्राने घेतला मोठा निर्णय वाचा सविस्तर)

यावर्षीच्या सुरुवातीला चीनने पहिल्यांदा हा प्रयोग सुरू केला. याचा उद्देश देशांतर्गत विकसित केलं जाणारं तंत्रज्ञान लोकांनी वापरावं आणि या क्षेत्रात देश स्वयंपूर्ण व्हावा असा आहे. सुरुवातीला सरकारी बँकांच्या बाबतीतही कंपन्यांनी हेच धोरण ठेवलं होतं. परदेशी बँकांवर जवळ जवळ बहिष्टार घालण्याचं आवाहन चिनी नागरिकांना करण्यात आलं होतं. (China Bans iPhone)

फोनमध्ये लागणारं सॉफ्टवेअर तसंच सेमीकन्डक्टर चिप यावर चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आणि देशात विकसित झालेलं तंत्रज्ञानच लोकांनी वापरावं असं सरकारला वाटत आहे. (China Bans iPhone)

(हेही वाचा – Ram lala Pran pratishtha : श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेबाबत जगभरातील हिंदुंमध्ये उत्साह)

आयफोनचा सर्वात मोठा उत्पादक कारखाना चीनमध्ये मध्य हेबे या प्रांतात आहे. पण, गेल्या महिन्यात या प्रांतासह झिजियांग, शॅनडाँग, लायनिंग आणि इतर ८ प्रांतांतील सरकारांनी पत्रक काढून कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आयफोन (iPhone) आणू नयेत असे निर्देश दिले आहेत. (China Bans iPhone)

इतके दिवस चीनमध्ये आयफोनची (iPhone) लोकप्रियता प्रचंड होती आणि ॲपल कंपनीसाठीही अमेरिकेबाहेर सगळ्यात मोठी बाजारपेठ चीन हीच होती. पण, आता ॲपल कंपनीनेही आपलं धोरण बदललं आहे. आयफोनचं उत्पादन भारतात सुरू करण्याचे प्रयत्न कंपनीने चालवले आहेत. कर्नाटकमध्ये आयफोन उत्पादनाचा एक मोठा कारखाना उभा राहत आहे. (China Bans iPhone)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.