Maharashtra : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख आणण्याचा मुहूर्त ठरला

173
Maharashtra : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख आणण्याचा मुहूर्त ठरला
Maharashtra : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख आणण्याचा मुहूर्त ठरला

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chatrapati Shivaji Maharaj) ज्या वाघनखांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा काढला आणि आदिलशाहीला हादरा दिला. ती वाघनखं आता महाराष्ट्रात (Maharashtra) आणण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या १६ नोव्हेंबर रोजी ती वाघनखं मुंबईमध्ये आणली जातील, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar) यांनी दिली. सर्वांना ही वाघनखं पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहेत. ही वाघनखं ज्या ठिकाणी ठेवण्यात येतील त्या ठिकाणी अफजलखानाच्या वधाचा प्रसंगही उभारण्यात येईल.

इंग्लंडसोबत सामंजस्य करार
छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. यावर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की, देशाची आणि महाराष्ट्राची अस्मिता असणारी शिवरायांची ही वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. या वाघनखांसाठी इंग्लंडकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.ही वाघनखं कुठेही फिरवता येणार नाहीत. ती संग्रहालयात एकाच ठिकाणी ठेवण्यात यावीत.या वाघनखांचे इन्शुरन्स काढण्यात यावं. जेणेकरून त्याची चोरी होऊ नये. या वाघनखांच्या सुरक्षेसंबंधित काय उपाययोजना करण्यात येणार आहे त्या सांगाव्यात. त्याच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी.

(हेही वाचा : Spreading Rumors : मुंबईत अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अल्पवयीन मुले आणि पोस्टाचा वापर)

जगदंबा तलवारही २०२४ पर्यंत भारतात
शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही सध्या ब्रिटनमध्ये असून ती परत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. ही तलवार २०२४पर्यत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जगदंब तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार असल्याची माहिती इतिहासात नोंद झालेली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.