Chandrakant patil: कोणत्याही शाखेतील मुलींना ६०० अभ्यासक्रमांचे मोफत शिक्षण, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

317
Chandrakant patil: कोणत्याही शाखेतील मुलींना ६०० अभ्यासक्रमांचे मोफत शिक्षण, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
Chandrakant patil: कोणत्याही शाखेतील मुलींना ६०० अभ्यासक्रमांचे मोफत शिक्षण, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

आजच्या आधुनिक काळात मुलींचे शिक्षण महत्त्वाचे मानले जाते. मुलींच्या शिक्षणासंदर्भात महत्त्वाची घोषणा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केली आहे. यामुळे आता सर्वसामान्य घरातील मुलींसाठीही शिक्षणाची दारे उघडणार आहेत.

येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना मेडिकल किंवा अभियांत्रिकी, अशा कोणत्याही शाखेतील ६०० अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

(हेही वाचा – BMC Schools : महापालिकेच्या शाळांमध्ये बसवणार ३६५४ जेलफोम फायर स्प्रेची अग्निशमन उपकरणे)

६०० वेगवेगळे अभ्यासक्रम…

या योजनेत ६०० वेगवेगळे अभ्यासक्रम घेण्यात आले आहेत. अभियांत्रिकी, मेडिकलसारख्या अभ्यासक्रमांना पालकांचे लाखो रुपये खर्च होतात. वैद्यकीय शिक्षणासाठीही करोडो रुपयांची आवश्यकता असते. त्यामुळे आता या घोषणेमुळे मुलींकरिता उच्च शिक्षण सुसह्य होईल, अशी खात्री व्यक्त होत आहे. (Chandrakant patil)

फक्त मुलींनाच मोफत शिक्षण का?

कार्यक्रम संपल्यानंतर मुलांनी फक्त मुलींनाच मोफत शिक्षण का, या उत्पन्नाखालील मुलांनादेखील शिक्षण मोफत करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी पाटील यांनी ही तुमची मागणी आपण मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister Eknath Shinde) कानावर घालू, असे आश्वासन दिले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.