BMC Schools : महापालिकेच्या शाळांमध्ये बसवणार ३६५४ जेलफोम फायर स्प्रेची अग्निशमन उपकरणे

एखाद्या प्रसंगी शालेय इमारतीमध्ये आग लागून आपत्कालिन प्रसंग उद्भवल्यास अशा वेळी आग विझवण्यासाठी आगप्रतिबंधक उपाययोजना राबवण्याच्या दृष्टीकोनातून ही अग्निशामक उपकरणे बसवण्यात येत आहे. यापूर्वी महापालिकेच्या सर्व शालेय इमारतींकरता पारंपारिक अग्निशमन यंत्र पुरवण्यात आलेले आहे.

360
BMC Schools : महापालिकेच्या शाळांमध्ये बसवणार ३६५४ जेलफोम फायर स्प्रेची अग्निशमन उपकरणे
BMC Schools : महापालिकेच्या शाळांमध्ये बसवणार ३६५४ जेलफोम फायर स्प्रेची अग्निशमन उपकरणे
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये आता आधुनिक अग्निशामक उपकरणे बसवण्यात येणार आहे. महापालिकेच्या ४५० शालेय इमारतींमध्ये सुमारे ३६५४ अग्निशमन उपकरणे बसवण्यात येत असून जेलफोम फायर स्प्रे अशीही उपकरणे आहेत. एखाद्या प्रसंगी शालेय इमारतीमध्ये आग लागून आपत्कालिन प्रसंग उद्भवल्यास अशा वेळी आग विझवण्यासाठी आगप्रतिबंधक उपाययोजना राबवण्याच्या दृष्टीकोनातून ही अग्निशामक उपकरणे बसवण्यात येत आहे. यापूर्वी महापालिकेच्या सर्व शालेय इमारतींकरता पारंपारिक अग्निशमन यंत्र पुरवण्यात आलेले आहे. (BMC Schools)

त्यामुळे दरवर्षी या अग्निशमन उपकरणांची देखभाल आणि पुनर्भरणा करणे गरजेचे असल्याने महापालिकेच्यावतीने आधुनिक अग्निशामक उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जेलफोम फायर स्प्रे साहित्य हे पुरक अग्निशमक यंत्र म्हणून विद्यार्थी, शालेय कर्मचारी व संपत्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांकरता खरेदी करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. (BMC Schools)

(हेही वाचा – Rajya Sabha Election : राष्ट्रवादीकडून बाबा सिद्दीकी राज्यसभेवर? तर भाजपचा चौथा उमेदवार पटेल?)

उपकरणांच्या खरेदीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करणार 

या उपकरणातील स्प्रे करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. या फायर स्प्रे करता तीन वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारची देखभाल व दुरुस्तीची गरज नाही. ते वापरण्यास अगदी सोपे व तांत्रिक तथा कुशल मनुष्यबळाची आवश्यकता नसते. म्हणून महापालिका शाळांमध्ये आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये आगप्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आधुनिक अग्निशामक साहित्य खरेदी केली जात असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. (BMC Schools)

महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालवल्या जात असून सुमारे ४५० शालेय इमारतींमध्ये या शाळा सुरु आहेत. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मिळून एकूण ३ लाख ९० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांसाठी ३६५४ अग्निशामक उपकरणे खरेदी केली जाणार असून प्रत्येकी ३३०० रुपये मोजले जात आहे. त्यामुळे या सर्व उपकरणांच्या खरेदीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी जेटकुल बायोकेमिकल टॅक्नॉलॉजी एलएलसी या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (BMC Schools)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.