Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत भारतात असणार जगातील सर्वाधिक मतदार

Lok Sabha Elections : निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि आसाममध्ये मतदारसंघांच्या सीमांकनानंतर मतदार याद्यांचे पुनरीक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर अहवाल प्रसारित करण्यात आला आहे.

247
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत भारतात असणार जगातील सर्वाधिक मतदार
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत भारतात असणार जगातील सर्वाधिक मतदार

निवडणूक आयोगाने (Election Commission) शुक्रवार, 9 फेब्रुवारी रोजी सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित विशेष सारांश पुनरावृत्ती 2024 अहवाल प्रसारित केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 97 कोटी लोक मतदान करू शकतील. (Lok Sabha Elections) 5 वर्षांत 2 कोटी नवीन मतदार जोडले. तसेच महिला, तरुण आणि अपंग मतदार वाढले, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

96.88 कोटी ही जगातील मतदारांची संख्या आहे, असे निवडणूक आयोगाने या वेळी स्पष्ट केले आहे. मतदारांचे लिंग गुणोत्तरदेखील 2023 मध्ये 940 वरून 2024 मध्ये 948 पर्यंत वाढले आहे. निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि आसाममध्ये मतदारसंघांच्या सीमांकनानंतर मतदार याद्यांचे पुनरीक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर हा अहवाल प्रसारित करण्यात आला आहे.

(हेही वाचा – BMC Schools : महापालिकेच्या शाळांमध्ये बसवणार ३६५४ जेलफोम फायर स्प्रेची अग्निशमन उपकरणे)

2 कोटी नवीन मतदारांमध्ये 18 ते 29 वयोगटातील मतदारांचा समावेश आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (highest voters in world)

काय आहे निवडणूक आयोगाच्या अहवालात ?
  • 1 कोटी 65 लाख 76 हजार 654 मृतांची नावे, अन्य ठिकाणी स्थलांतरित आणि डुप्लिकेट मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
  • वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये 67 लाख 82 हजार 642 मृत मतदार, 75 लाख 11 हजार 128 गैरहजर मतदार आणि 22 लाख 5 हजार 685 डुप्लिकेट मतदारांचा समावेश आहे.
  • मतदारयादीत 2.63 कोटींहून अधिक नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यापैकी सुमारे 1.41 कोटी महिला मतदार आहेत. त्यांची संख्या नोंदणीकृत पुरुष मतदारांपेक्षा (1.22 कोटी) 15 टक्के अधिक आहे.
  • सुमारे 88.35 लाख अपंग मतदार नोंदणीकृत आहेत.
  • 17 वर्षांवरील 10.64 लाख तरुणांनी आपली नावे मतदान यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज केले आहेत. यामध्ये 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या तीन तारखांना 18 वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Ashwamedh Mahayagya : २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान नवी मुंबईत होणार अश्वमेध महायज्ञ)

प्रचारात मुलांचा वापर नको – आयोगाची सूचना

निवडणूक प्रचारात कोणत्याही स्वरूपात लहान मुलांचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे. निवडणूक पॅनेलने पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर आणि पॅम्प्लेट वाटणे आणि घोषणाबाजी करणे याला निवडणूक आयोगाने झिरो टॉलरन्स व्यक्त केला आहे. आयोगाने सर्व राजकीय पक्षांना ॲडव्हायझरीमध्ये जारी केली आहे. (Lok Sabha Elections)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.