Central Railway : मालवाहतुकीत मध्य मुंबईची उत्तम कामगिरी; महसुलात नोंदवली ‘इतके’ टक्के वाढ

123
Central Railway : मालवाहतुकीत मध्य मुंबईची उत्तम कामगिरी; महसुलात नोंदवली 'इतके' टक्के वाढ
Central Railway : मालवाहतुकीत मध्य मुंबईची उत्तम कामगिरी; महसुलात नोंदवली 'इतके' टक्के वाढ

या आर्थिक वर्ष २०२३ मधील एप्रिल-ऑगस्ट २०२३ या कालावधीत ८.९६ दशलक्ष टन लोडिंगसह ९५७.६६ कोटी महसूल मिळविला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ७.६७ दशलक्ष टन लोडिंगमधून ७८१.१० कोटी होते, ज्यामध्ये २१.७६ टक्यांनी महसुलात वाढ नोंदविली. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाने सर्व वस्तूंच्या मालवाहतुकीत सुधारणा केली आहे. ऑगस्ट महिन्यात ही मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची आतापर्यंतची सर्वोत्तम मालवाहतूक असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

(हेही वाचा – Shashan Aplya Daari : मविआच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने गेल्या महिन्यात ८.९६ दशलक्ष टन मालवाहतूक केली, त्यातून ९५७.६६ कोटींची कमाई केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ मधील १.७५ दशलक्ष टन मालवाहतुकीपेक्षा १०.२ टक्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

या महिन्यात ‘क्रू’ बदलण्याच्या वेळेत ५ मिनिटांची बचत झाली. ड्रायव्हर / गार्ड पूर्वी सीएसएमटी / दादर / एलटीटी ते इगतपुरीपर्यंत गाड्या चालवायचे, ते आता मनमाडपर्यंत ट्रेन चालवतील. मुंबई विभागाने ऑगस्टमध्ये २७७ विशेष गाड्या चालविल्या, तर ५४९ पार्सल डबे लोड केले. मध्य रेल्वेने ऑगस्टमध्ये जिंदाल स्टील साइडिंग येथून १४९ लोखंड आणि स्टीलचे रेक लोड केले. गेल्या एप्रिल महिन्यात जिंदालमधून १४१ लोखंड आणि स्टीलचे रेक लोड केले होते. २१ ऑगस्टपासून, क्रू (ट्रेन मॅनेजर/ड्रायव्हर/गार्ड ऑफ मेल/गार्ड ऑफ एक्स्प्रेस ट्रेन्स) ६ जोड्या गाड्यांची लिंक प्रथम इगतपुरी ते मनमाडपर्यंत वाढविली, असे सांगण्यात आले. (Central Railway)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.