Shashan Aplya Daari : मविआच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

समाजकंटक जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतायेत

31
Shashan Aplya Daari : मविआच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Shashan Aplya Daari : मविआच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले? लाखा-लाखांचे मोर्चे निघाले.५८ मूक मोर्चे निघाले होते. लोक याला विसरणार नाहीत. पण, आता राजकारण सुरु आहे.महाविकास आघाडीच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले. शासन आपल्या दारी (Shashan Aplya Daari) कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा येथे आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केले.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी जालन्याचे पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहेत. तसेच अपर पोलिस अधीक्षक राहूल खाडे आणि डीवायएसपी यांच्या बदली करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.जालना येथील लाठीहल्ला प्रकरणाची चौकशी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सक्सेना यांच्यामार्फत केली जाणार आहे.

(हेही वाचा : Train Derailed In Delhi : G20 च्या पार्श्वभूमीवर गंभीर प्रकार; दिल्लीतील प्रगती मैदानाजवळ ट्रेन रुळावरून घसरली)

ते जालना येथे जाऊन ही चौकशी करणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मराठा समाज संयमी आहे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे समाज कधीही करणार नाही. त्यामुळे दगडफेक कोणी केली हे पाहावे लागले. कोणी नेते, समाजकंटक जातीय सलोख बिघडवण्याचा प्रयत्न करताहेत का याची माहिती येत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.