Book Launch : ५ नोव्हेंबरला होणार सेलिब्रेटी शेफ डॉ. तुषार देशमुख यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

268
Book launch event for Dr. Tushar Deshmukh's autobiography.
Join us for the launch of Dr. Tushar Deshmukh's autobiography.

प्रख्यात सेलिब्रेटी शेफ डॉ. तुषार प्रीती देशमुख (Tushar Deshmukh) यांच्या ‘शून्य बघितलेला माणूस’ या आत्मचरित्राचे प्रकाशन येत्या ५ नोव्हेंबरला होणार आहे. (Book Launch) महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या हस्ते प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात (Ravindra Natya Mandir) सकाळी ११ वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नेते सुनील देवधर व ‘आम्ही उद्योगिनी’ प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ. मीनल मोहाडीकर या उपस्थित रहाणार आहेत.

(हेही वाचा – Kartiki Ekadashi 2025: कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा)

या आत्मचरित्राचे (autobiography) शब्दांकन ज्येष्ठ लेखिका आणि पत्रकार जयश्री देसाई यांनी केले आहे. मुद्रणाच्या दुनियेतले महर्षि आनंद लिमये यांच्या प्रकाशनातर्फे ते प्रकाशित होत आहे.

अत्यंत विपरीत परिस्थिती वारंवार ओढवूनही डॉक्टर तुषार प्रीती देशमुख यांनी स्वतःचे स्थान तर निर्माण केलं आहेच; पण असंख्यांना जीवनदान सुद्धा दिले आहे. हे पुस्तक ही त्याचीच प्रेरणादायी गाथा आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. तुषार प्रीती देशमुख, तसेच प्रकाशक आनंद लिमये यांनी केले आहे. (Book Launch)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.