CBI : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर सीबीआयचा छापा

नरेश गोयल यांची पत्नी अनिता गोयल यांच्यासह अनेक लोक बँक फसवणूक (CBI) प्रकरणात आरोपी आहेत.

137
CBI
CBI : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर सीबीआयचा छापा

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर सीबीआयनं (CBI) छापे टाकले आहे. निधीचा गैरवापर झाल्या प्रकरणी ही कारवाई झाली. ५३८ कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणी सीबीआयने संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) यांच्यावर ही मोठी कारवाई केली. गोयल यांच्या कार्यालयासह सात ठिकाणी सीबीआयनं (CBI) छापे टाकले आहेत. याशिवाय विमान कंपनीचे माजी संचालक गौरांग आनंद शेट्टी यांच्या निवासस्थानाची आणि कार्यालयांची देखील सीबीआयकडून (CBI) चैकशी करण्यात आली.

(हेही वाचा – CBI : दिल्लीतील १९ जागांवर सीबीआयची कारवाई; २० कोटी जप्त)

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार…

जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील परिसर, एअरवेजचे माजी अधिकारी आणि गोयल यांच्या जागेवर छापे (CBI) टाकण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कॅनरा बँकेच्या तक्रारीनंतर फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप (CBI) करण्यात आला आहे. नरेश गोयल यांची पत्नी अनिता गोयल यांच्यासह अनेक लोक बँक फसवणूक (CBI) प्रकरणात आरोपी आहेत.

हेही पहा – 

जेट एअरवेज ही एकेकाळी भारतातील सर्वात मोठ्या खाजगी विमान कंपन्यांपैकी एक होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.